
उर्फी जावेद ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या फॅशनमुळे चर्चेत आहे. उर्फी कायमच तिच्या अतरंगी लूकमध्ये स्पाॅट होते. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमध्ये मिळालीये.

उर्फी जावेद हिने अनेक टीव्ही मालिकांमध्येही महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. आज उर्फी जावेद हिचा चाहता वर्गही अत्यंत मोठा आहे. मात्र, कायमच कपड्यांमुळे उर्फी जावेद हिच्यावर टिका केली जाते.

नुकताच उर्फी जावेद हिचे सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. उर्फी जावेद हिचा लूक पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

बॉटम वेअरमध्ये ग्रीन रंगाचा आउटफिटमध्ये उर्फी जावेद दिसली. विशेष म्हणजे तिने हा ड्रेस सापासारखा गुंडाळला आहे. यामुळे तिचा हा लूक चर्चेत आलाय. युजर्सने उर्फी जावेद हिचा हा नागिन लूक बघितल्यानंतर म्हटले आहे की, आता नागिन मालिकेत उर्फी जावेदच दिसणार

एका युजर्सने कमेंट करत लिहिले की, हा नेमका का प्रकार आहे? दुसऱ्याने लिहिले की, हे काय आहे....सध्या सोशल मीडियावर उर्फी जावेद हिच्या नव्या लूकची जोरदार चर्चां रंगताना दिसत आहे. तसेच एकता कपूरच्या नागिन मालिकेसाठी हिच नागिन पाहिजे, असेही काहींनी म्हटले.