
उर्फी जावेद ही तिच्या बोल्ड लूकसाठी ओळख जाते. अनेकदा उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे खडेबोल सुनावले जातात. बिग बाॅस ओटीटीपासून उर्फी जावेद हिला खरी ओळख मिळालीये.

नुकताच उर्फी जावेद हिने बिकिनीमधील काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये उर्फी जावेद ही तिच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहे.

फोटोसोबतच उर्फी जावेद हिने काही व्हिडीओही शेअर केले आहेत. या फोटोमध्ये उर्फी जावेद ही बिकिनीमध्ये दिसत आहे. मात्र, अनेकांना उर्फी जावेद हिचा हा लूक अजिबातच आवडला नाहीये.

ईदच्या दिवशी बिकिनीतील फोटो शेअर केल्याने आता उर्फी जावेद ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीये. कमीत कमी आजच्या दिवशी तरी व्यवस्थित कपडे घालायचे असते, असा सल्ला अनेकजण उर्फी जावेद हिला देत आहेत.

एकाने लिहिले की, ईदच्या दिवशी तरी ईदसारखे कपडे घातले असतेस. दुसऱ्याने लिहिले की, आज तरी उर्फी जावेद तू चांगले कपडे घालून फोटोशूट केले असते. एकाने उर्फी जावेद हिला आज ईद असल्याची आठवण करून दिलीये.