
सध्या सर्वत्र अभिनेता वरूण धवन याची भाची अंजिनी धवन हिची चर्चा रंगली आहे. अंजनी हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अंजिनी ‘बिन्नी एंड फॅमिली’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सिनेमात 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या सर्वत्र अंजिनी हिच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगली आहे.

सिनेमात अंजिनी हिच्यासोबत पंकज कपूर, राजेश कुमार, हिमानी शिवपुरी आणि चारु शंकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

अंजिनी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती फक्त 24 वर्षांची आहे. सोशल मीडियावर अंजिनी कायम सक्रिय असते. अंजिनी तिच्या घायाळ अदांमुळे देखील चर्चेत असते.

अंजिनी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सेलिब्रिटी किड असल्यामुळे सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.