
अभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्यासोबत देखील विराट कोहली याच्या नात्याची चर्चा रंगली होती. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. तमन्ना हिने विराट सोबत असलेल्या नात्यावर मौन देखील सोडलं होतं.

'मिस्टर मजनू', 'वर्ल्ड फेमस लव्हर' या सिनेमांमध्ये काम केलेल्या इसाबेलने 2013 मध्ये विराट कोहलीसोबत रोमान्स केला होता. कोहली आणि इसाबेल यांना सिंगापूरमध्ये एकत्र फिरताना देखील स्पॉट करण्यात आलं.. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

काही वर्षांपूर्वी ड्रग्स माफियामध्ये अटक झालेली कन्नड अभिनेत्री संजना गलराणी हिच्यासोबतही कोहलीच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या.

मॉडेल आणि अभिनेत्री सारा जेन हिला देखील विराट कोहली याने डेट केलं होतं. दोघांना अनेक ठिकाणी फिरताना देखील स्पॉट करण्यात आलं. पण काही वर्षांनंतर दोघांचं ब्रेकअप झालं.

अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला देखील अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. आज विराट आणि अनुष्का मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत.