
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचं लग्न 2007 मध्ये मोजक्याच पाहुण्यांमध्ये झाले होतं. दोघांना आता 12 वर्षांची मुलगी आराध्या देखील आहे. आजही चाहत्यांमध्ये ऐश्वर्या - अभिषेक यांच्या लग्नाची चर्चा रंगलेली असते.

मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नासाठी तब्बल 7 ते 8 कोटी रुपयांचा खर्च झाला होता. एवढंच नाही तर, लग्नात ऐश्वर्या हिने नेसलेल्या साडीची किंमत तेव्हा 75 लाख रुपये होती.

अभिषेक याने 2007 मध्ये न्यूयॉर्क येथील अपार्टमेंट मधील बालकनीतून ऐश्वर्या हिला लग्नाची मागणी घातली होती. तेव्हा दोघांनी एकत्र असल्याची अधिकृत घोषणा केली होती.

एककाळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या - अभिषेक यांच्या नात्याची चर्चा होती. आजही ऐश्वर्या - अभिषेक कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या - अभिषेक त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अंबानींच्या लग्नात देखील दोघे वेगळे पोहोचले. ऐश्वर्या आणि आराध्या यांच्यासोबत न आल्यामुळे अभिषेक याला सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आलं.