
दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर असो किंवा सैफची लाडकी सारा अली खान किंवा बॉलिवूडच्या गर्ल गँगबद्दल चर्चा करायची असेल तर ‘ही’ व्यक्ती त्यांच्यात खूप लोकप्रिय आहे. ओरहान अवात्रामणि ऊर्फ ऑरी असं या व्यक्तीचं नाव आहे. अमिताभ बच्चन यांची नात नव्या किंवा संजय कपूरची मुलगी शनाया हे सगळे ओरहानबरोबर वेळ घालवताना दिसत आहेत. अर्थात ही व्यक्ती बॉलीवूडच्या गर्ल गँगमध्ये लोकप्रिय आहे.

ओरहानला जान्हवी कपूर आणि सारा अली खान, नव्या नवेली नंदा, सलमानची भाची एलिजा अग्निहोत्री, जावेद जाफरी यांची मुलगी अलाविया, अनन्या पांडे आणि पूजा बेदीची मुलगी आलिया इब्राहिम यांच्यासोबत नेहमी स्पॉट करण्यात येतं.

बॉलिवूड पार्ट्यांमध्येही ओरहान उपस्थित राहतो. तो करीना कपूर आणि तब्बूसारख्या ज्येष्ठ अभिनेत्रींच्या ही अगदी जवळ आहे आणि त्यांच्यासोबत फोटो पोस्ट करत असतो.

ओरहान सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतो. जान्हवी आणि सारा अली खानशी त्याची मैत्री त्याहून अधिक आहे. हे सगळे एकत्र सुट्टीवर जातात.

ओरहान कधी समुद्रकिनार्यावर जान्हवी कपूरचा हात धरलेला तर कधी सारा अली खानबरोबर बीचवर मस्ती करताना दिसतो. यावरून असं दिसून येतं की त्यांची एकमेकांशी अगदी जवळची मैत्री आहे. दोन्ही अभिनेत्रीसुद्धा ओरहानबरोबर फोटो शेअर करतात.

टीओआयच्या वृत्तानुसार, ओरहान स्टार किड नसून एक कार्यकर्ता आहे. मुंबईतील रहिवासी असलेल्या ओरहानने कोलंबिया विद्यापीठातून सारा अली खानबरोबर पदवी संपादन केली. त्याचवेळी या दोघांमध्येही एक सखोल मैत्री होती आणि आता दोघंही एकमेकांना बेस्ट फ्रेंड म्हणतात.