जया बच्चन सतत चिडचिड का करतात? खरं कारण अखेर समोर

जया बच्चन यांचा पापाराझींवरील राग हा क्लॉस्ट्रोफोबियामुळे आहे, असे अभिषेक आणि श्वेता बच्चन यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी कॉफी विथ करण या कार्यक्रमात सांगितले की, जया बच्चन यांना गर्दीचा त्रास होतो आणि पापाराझींच्या उपस्थितीमुळे त्यांना गुदमरल्यासारखे वाटते. त्यांच्या मते, पापाराझींनी परवानगीशिवाय फोटो काढू नयेत.

| Updated on: Apr 11, 2025 | 2:29 PM
1 / 9
अभिनेत्री जया बच्चन या कायमच पापाराझींवर चिडताना दिसतात. जया बच्चन या त्यांच्या रागीट स्वभावासाठी ओळखल्या जातात. जया बच्चन या सार्वजनिक ठिकाणी रागावतानाही दिसतात. त्यांचे फोटो घेणाऱ्या, त्यांच्याबरोबर फोटो काढू इच्छित असणाऱ्यांवरही त्या चिडतात.

2 / 9
जया बच्चन या इतक्या रागात का असतात? याबद्दलचे खरं कारण समोर आलं आहे. जया बच्चन यांची मुलगी श्वेता आणि मुलगा अभिषेक बच्चन यांनी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात याबद्दल भाष्य केले होते.

3 / 9
अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन यांनी काही वर्षांपूर्वी २०१९ कॉफी विथ करण या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्या दोघांनी जया बच्चन यांना राग का येतो? त्या पापाराझीवर का भडकतात? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

4 / 9
जया बच्चन यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यात त्या पापाराझीवर चिडतात, ओरडतात, ट्रोल करतात असेही बोललं जाते, पण यामागचे नेमकं कारण काय? असे करणने विचारले.

5 / 9
त्यावर श्वेता बच्चन म्हणाली, “मी एकदा माझ्या आईला याबद्दल विचारले होते. त्यावर ती माझ्यावर प्रचंड चिडली, तुम्हा लोकांना तर काहीही येत नाही. फक्त खिल्ली उडवता येते. मी क्लॉस्ट्रोफोबिक आहे. जेव्हा मी माझ्या आजूबाजूला इतकी लोक पाहते, तेव्हा मला त्यांना एकत्र सांभाळता येत नाही.”

6 / 9
"मी, आई, बाबा आणि ऐश्वर्या असे चौघेजण जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो, तेव्हा आम्ही आमची मानसिक तयारी करुन जातो. कारण पापाराझी समोर आल्यावर काय होणार याची आम्हाला कल्पना नसते", असे अभिषेक म्हणाला.

7 / 9
"पण जेव्हा श्वेता दीदी आमच्याबरोबर असते तेव्हा आम्ही तिला आईबरोबर पाठवतो", असेही अभिषेकने सांगितले.

8 / 9
त्यावर करणने जया बच्चन यांना नेमका कशाबद्दल त्रास होतो असे विचारले. त्यावर श्वेताने “तिला क्लॉस्ट्रोफोबिक आहे, तिला गुदमरल्यासारखे वाटते. पापाराझी तिच्यापासून खूप लांब अंतरावर उभे असतील तरीही तिला तसे होते, असे सांगितले.

9 / 9
कारण याआधी भारतात पापाराझी मोठ्या प्रमाणात नव्हते. पण आता त्यांची इच्छा अशी असते की तुम्ही जर माझा फोटो काढत आहात, तर त्यापूर्वी माझी परवानगी घ्यावी”, असेही श्वेता बच्चन म्हणाली.