
शमीची पत्नी हसीन जहाँ गेल्या अनेक वर्षांपासून पतीपासून दूर राहत आहे. ‘भारतीय संघाला शुभेच्छा देईल पण, शमीला नाही…’ असं वक्तव्य शमी याच्या पत्नीने केलं होतं. सध्या शमी याच्या पहिल्या पत्नीच्या कमाईबद्दल देखील मोठी माहिती समोर आली आहे.

हसीन जहाँ सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. मॉडेलींग करियरशिवाय हसीन जहाँ हिने आयपीएलमध्ये चीयर लिडर देखील राहिली आहे. सोशल मीडियावर देखील हसीन जहाँ हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. हसीन जहाँ हिचे सोशल मीडियावर जवळपास 2.33 लाख फॉलोअर्स आहेत.

हसीन जहाँ सोशल मीडियावर अनेक फॅशन ब्रॅन्ड्सचं प्रमोशन करत असते. इन्स्टाग्रामवर फॅशन ब्रॅन्ड्सचं प्रमोशन करत हसीन कोट्यवधींची कमाई करते. रिपोर्टनुसार हसीन जहाँ हिच्या नेट वर्थबद्दल सांगायचं झालं तर, क्रिकेटपटूची पहिली पत्नी 2 ते 3 कोटी रुपयांचा मालकीण आहे.

रिपोर्टनुसार शमी याची पहिली पत्नी हसीन जहाँ महिन्याला जवळपास 1 ते 2 लाख रुपयांची कमाई करते. शमीच्या पहिल्या पत्नीकडे फक्त गडगंज संपत्तीच नाही तर, एक ऑडी कार देखील आहे.

हसीन जहाँ हिने शमी पासून विभक्त झाल्यानंतर खर्चासाठी महिन्याला 10 लाख रुपयांची मागणी केली आहे. तेव्हा शमी वकिलांना म्हणाला होता, 'हसीन एक मॉडेल आहे आणि ती चांगली कमाई करते...' शमी कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो.