
स्टार प्लसचा प्रसिद्ध शो 'ये है मोहब्बतें'चा अभिनेता अभिषेक मलिकने त्याच्या दीर्घकालीन मैत्रीण सुहानी चौधरीशी लग्न केलं आहे. अभिषेक आणि सुहानी यांचे दिल्लीत त्यांचे कुटुंबीय आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न झालं. त्यांच्या लग्नाच्या दिवशी, हे जोडपं लाईट रंगांच्या मॅचिंग ड्रेसमध्ये सुंदर दिसत होते. अभिषेकने शेरवाणी परिधान केली होती, तर सुहानीने पूर्ण बाही चोलीसह अत्यंत भारी ब्रायडल लेहेंगा परिधान केला होता.

अभिषेक आणि सुहानीने त्यांच्या लग्नापूर्वीच्या फंक्शन्सचा पुरेपूर आनंद घेतला. लग्नाच्या फोटोंबरोबरच अभिषेकने त्याच्या इन्स्टाग्रामवर इतर सेलिब्रेशनचे फोटोही शेअर केले आहेत. सुहानी चौधरी व्यवसायाने फॅशन स्टायलिस्ट आहे.

अभिषेकने सुहानीसोबत खूप रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये दोघंही एकमेकांना किस करताना दिसले.

लग्नापूर्वी साखरपुड्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात हे जोडपे अतिशय रोमँटिक पोज देताना दिसले.

एवढंच नाही तर पूर्ण फिल्मी स्टाईलमध्ये अभिषेकने सुहानीला गुडघ्यावर बसून अंगठी घातली.