
मुनव्वर फारुकी... बिग बॉसच्या 17 व्या सिझनचा विजेता... पण सामान्य घरातून येणाऱ्या मुनव्वरच्या आयुष्यात वेगवेगळी वळणं आली.

घर चालवण्यासाठी त्याने कधी भांड्याच्या दुकानात काम केलं तर कधी त्याने ग्राफिक्स डिझायनिंगचं काम केलं. पण त्याला त्याच्यातील स्टँड- अप कॉमेडियन सापडला अन् मुनव्वर युट्यूबर झाला.

2020 ला मुनव्वरने आपला पहिला स्टँड-अप शो युट्यूबवर अपलोड केला. अन् त्याच्या या व्हीडिओंना लाखो लोक बघू लागले. लोकांची त्याला पसंती मिळू लागली.

पण 2021 ला धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप मुनव्वरवर करण्यात आला. 35 दिवस तो या प्रकरणी अटकेत होता. पुढे सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. पण आरोपांची राळ अन् अटक हा काळ मुनव्वरच्या आयुष्यातील बॅड पॅच होता.

या सगळ्यानंतर मात्र मुनव्वरच्या आयुष्यातील चांगला काळ सुरु झाला. कंगना रनौतच्या लॉकअप या शोचा तो विजेता झाला. तसंच बिगच्या 17 व्या सिझनही त्याने जिंकला.