
छत्रपती संभाजीनगर येथे मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी झाली आहे. मनोज जरांगे यांच्या सूचनेनुसार छत्रपती संभाजीनगर शहरात मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

लोकसभा उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक सुरू होती. मराठा मंदिरमध्ये मराठा समाजाची बैठक सुरू असताना हा सर्व वाद झाला.

आम्ही मराठा समाजासाठी आलो होतो. काही लोक सुपारी घेऊन आले होते. असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच आहोत, असं एका महिला ओरडून ओरडून सांगत होती.

कोणी कोणाच नाव घेऊन बोलायच नाही, असं ठरलेलं. मात्र तरीही काही नाव घेण्यात आली. त्यावरुन ही सर्व वादावादी, हाणामारी झाली असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.

सकल मराठा समाजाच्यावतीन गरजवंत मराठ्यांसाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. कोणी कोणाच नाव घ्यायच नाही, सर्वसंमतीने उमेदवार ठरवला जाणार होता. काही मतभेद असतील, तर मनोज जरांगे पाटील यांच्यााकडे जायच असं ठरलेलं. मात्र काही जणांची नाव पुकारण्यात आली, त्यावरुन वादावादी झाली, असं बैठकीत सहभागी असलेल्यांनी सांगितलं.