
लोंग दातासाठी प्रभावी ठरते. लोंगची पावडर करुन त्यात मीठ मिक्स करा. हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी वेदना होणाऱ्या दातांच्या खाली ठेवा. सकाळी उठल्यावर दातांचे दुखणे गेलेले दिसणार आहे.

लिंबूचा रस दातांसाठी फायदेशीर आहे. बॅक्टेरिया संपवण्यास लिंबूचा रस महत्वाचे काम करते. एक ग्लास कोमट पाणी घेऊन त्यात लिंबू पिळून घ्या. त्याचे गुळणी केल्यावर दातांना आराम मिळेल. वेदना कमी होतात.

कांदा स्वयंपाकघरात नियमित लागणारा पदार्थ आहे. खाद्यपदार्थांचा स्वाद वाढवणारा कांदा दातांच्या दुखण्यावर गुणकारी आहे. कांदाचे तुकडे करुन दातांच्या मध्ये ठेवल्यास दात दुखणे कमी होते.

कडुलिंबची पाने गुणकारी आहेत. दातांसाठी ते प्रभावी आहे. कडुलिंबच्या पानांचा रस करुन त्याने गुळणे करा. दुखणे निर्माण करणारे बॅक्टेरिया मरुन जातात. त्यामुळे दातांच्या वेदना कमी होतात.

हळद आणि मीठ दात दुखणे थांबवण्यासाठी गुणकारी आहेत. एक चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा मीठ घेऊन एका कटोरीत पेस्ट बनवा. या पेस्टने दातांवर हळूवार मसाज करा. हळूहळू वेदना कमी होतील.