
आज राज्यात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवतीर्थावर दाखल होत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतींना वंदन केले.

मुख्यमंत्र्यांच्या सोबत बंडखोर आमदार ही बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर आले होते. स्वर्गीय बाळासाहेबांना मी गुरु मनात असल्याचे त्यांनी म्हटले होते. बाळासाहेब व आनंद दिघे यांच्यामुळेच आज मी इथे असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले होते.

शिवतीर्थानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद आश्रम जाऊन स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांनी प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन केले.

याप्रसंगी आ. प्रताप सरनाईक , रवींद्र पथक,संजय शिरसाट , माजी महापौर डॉ.किणीकर बालाजी , माजी परिवहन समिती सभापती विलास जोशी,माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक ,शिवसेना नगरसेवक,पदाधिकारी व ठाण्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंद आश्रम येथे उपस्थित लोकनाकडून शुभेच्छांचा स्वीकार केला