
काॅमेडियन, स्क्रीन रायटर, प्रोड्यूसर आणि टीव्ही शो होस्ट करणारा भारती सिंहचा पती हर्ष लिंबाचिया हा नेहमीच चर्चेत असतो. हर्ष लिंबाचिया याची फॅन फाॅलोइंगही जबरदस्त आहे.

नुकताच हर्ष लिंबाचियाने मोठा खुलासा करत सांगितले की, तो बारावी नापास आहे. हेच नाही तर हर्ष लिंबाचियाचे बोलणे ऐकून भारती सिंह देखील हैराण झाली.

यावर भारती सिंह म्हणते की, ही गोष्ट मला आजच समजली आहे. हर्ष लिंबाचिया आज जरी बारावी नापास असला तरीही तो कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे.

अनेक शोमध्ये हर्ष लिंबाचिया धमाका करताना दिसलाय. सोशल मीडियावर हर्ष लिंबाचिया हा सक्रिय दिसतो. अनेक शो हर्ष लिंबाचियाने होस्ट केले आहेत.

हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंह हे ब्लाॅगच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. हर्ष लिंबाचिया आणि भारतीचा एक मुलगा देखील आहे, ज्याचे ना गोला आहे.