तुम्हालाही राग, चिडचिड अन् तणाव जाणवतोय? हे रत्न तुम्हाला ठरेल फायदेशीर

ज्योतिषशास्त्रानुसार, एक रत्न आहे जो मानसिक संतुलन आणि जीवनात शांती मिळविण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. हे दुर्मिळ रत्न योग्यरित्या धारण केल्याने रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. चला जाणून घेऊया हा भाग्यवान रत्न कोणता आहे?

| Updated on: Dec 12, 2025 | 10:56 PM
1 / 6
काही लोकांना सहज आणि पटकन राग येतो. रागाच्या भरात बोललेली किंवा केलेली कृती नंतर पश्चात्तापाची कारण ठरते. म्हणूनच मानसिक शांती टिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्योतिषशास्त्रातील रत्नशास्त्र शाखेनुसार, काही रत्न भावनांना संतुलित करून रागावर नियंत्रण मिळवण्यास मदत करतात. यापैकी एक प्रभावी रत्न म्हणजे मोती. चला जाणून घेऊया मोती धारण करण्याचे फायदे आणि योग्य पद्धत.

2 / 6
चंद्राचे रत्न - मोती : मोती हे चंद्र ग्रहाशी संबंधित रत्न आहे. चंद्र हा मन आणि भावनांचा कारक आहे. कुंडलीत मजबूत चंद्र शांत आणि संयमी स्वभाव देतो, तर कमकुवत चंद्रामुळे भावनिक अस्थिरता आणि राग वाढतो. मोती धारण केल्याने मानसिक तणाव कमी होतो आणि रागावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते.

3 / 6
मोती धारण करण्याची योग्य वेळ : सोमवारी मोती धारण करणे शुभ मानले जाते. धारण करण्यापूर्वी रत्न शुद्ध करणे आवश्यक आहे. शुद्धीकरणासाठी गंगाजल, कच्चे दूध आणि मधाचा वापर करावा. योग्य विधी करूनच शुद्ध मोती घालावे.

4 / 6
कोणत्या धातूत घालावे : चांदीत मोती बसवणे सर्वात शुभ आहे. चांदी सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि रत्नाची शक्ती मजबूत करते. त्यामुएल तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण मिळवण्यास काहीसे यश मिळते. त्याचबरोबर मनातील नकरात्मकता देखील कमी होते.

5 / 6
कोणत्या बोटात आणि कोणत्या राशींसाठी : करंगळी बोटात मोती घालणे शुभ समजले जाते. मेष, कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांसाठी मोती विशेष फायदेशीर ठरते. कुंडलीत चंद्र कमकुवत असल्यास हे रत्न आणखी प्रभावी होते.

6 / 6
मोती धारण करण्याचे फायदे : मोती घातल्याने मानसिक शांती मिळते, राग व तणाव कमी होतो, मनात सकारात्मकता येते आणि निर्णयक्षमता सुधारते. घर आणि कामाच्या ठिकाणी शांतता नांदते. शांत मन रागावर सहज नियंत्रण ठेवते. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)