AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदाबाद विमान अपघाताचे कारण थेट पुढे, अमेरिकेच्या एजन्सीचा खळबळजनक दावा, थेट म्हटले, पहिल्यापासूनच..

अहमदाबादहून लंडनच्या दिशेने निघालेल्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमान अपघातात 260 जणांचा जीव गेला. आता या विमान अपघाताबद्दल अत्यंत खळबळ उडवणारी माहिती पुढे येताना दिसत आहे. ज्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

अहमदाबाद विमान अपघाताचे कारण थेट पुढे, अमेरिकेच्या एजन्सीचा खळबळजनक दावा, थेट म्हटले, पहिल्यापासूनच..
Ahmedabad Air India plane crash
| Updated on: Mar 15, 2026 | 10:57 AM
Share

अहमदाबादहून लंडनच्या दिशेने निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात विमानातील फक्त एकच व्यक्ती जिवंत वाचू शकला. या विमान अपघातात  260 लोकांचा जीव गेला. या विमान अपघातापूर्वीचा एक व्हिडीओ देखील पुढे आला. या विमान अपघातानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. सुरूवातीला थ्रस्टमुळे हा अपघात झाल्याचे सांगितले गेले. मात्र, आता या विमान अपघाताबद्दल अत्यंत धक्कादायक माहिती पुढे येत आहे. अपघात नक्की कशाने झाला याचे कारण पुढे आले. अहमदाबाद विमानतळाहून उड्डाण केल्यानंतर काही सेकंदात पायलट सुमित सभरवाल यांनी मेडेला एमर्जन्सी मेसेज पाठवला होता. 650 फूट उंचावरून मेडे मेडे मेडे असे त्यांनी म्हटले होते. मात्र, काहीही झाले नाही आणि काही सेकंदाच्या आतच विमान थेट अहमदाबाद विमानतळाच्या शेजारी असलेल्या मेडिकल हॉस्टेलच्या इमारतीवर जाऊन धडकले. आता या विमान अपघाताबद्दल धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

अमेरिकेच्या हवाई सुरक्षा संस्थेचा दावा आहे की, अहमदाबाद विमान अपघातातील काही महत्वाचे कागदपत्रे तपास अधिकाऱ्यांना देण्यातच आली नाही. यावरून आता विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या ईमेजमध्ये सेफ्टी फाऊंडेशनच्या एग्झिक्यटिव्ह डायरेक्टर ईडी पियरसने म्हटले की, त्यांच्या हाती आता असे काही कागदपत्रे सापडली आहेत, ज्यावरून हे स्पष्ट होते की, विमानाचा अपघात इलेक्ट्रिक खराबीमुळे झाला.

पियरसनने म्हटले की, बोइंग 787 ड्रीमलाइनर रजिस्ट्रेशन वीटी- ANB च्या कागदपत्रांहून कळते की, इलेक्ट्रिक सिस्टममध्ये अगोदरपासूनच काही समस्या होत्या. त्यांनी दावा केला की, विमानात गेल्या काही महिन्यांपेक्षाही अधिक काळापासून शॉर्ट शर्किट, वायरिंगची समस्या आणि धुर निघण्याची समस्या होती. हेच नाही तर अपघात होण्यापूर्वी कितीतरी वेळा हे विमान इलेक्ट्रिक समस्यांमुळे आपत्कालीन उतरवण्यात आले.

अनेकदा या विमानाचा पी100 पावर पॅनल देखील बदलण्यात आला होता. पियरसनने हे देखील म्हटले की, विमानाला डिजाईन आणि मेडिफिकेशन आणि सॉफ्टवेअर प्रोटेक्शनची गरज होती. हा विमान अपघात नक्की कसा झाला आणि यामागील कारण नक्की काय? हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे असतानाच आता हा मोठा खुलासा करण्यात आला आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल