PHOTO | कोरोनामुळे IPL 2021 चा बाजार उठला, ‘या’ स्पर्धांवरही धोका कायम, भारताला यजमानपद गमावावं लागणार?

| Updated on: May 07, 2021 | 12:00 AM

कोरोनाच्या (Corona) वाढत्या रुग्णसंख्येमुळे बीसीसीआयने आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित करण्यात आला. मात्र या कोरोनामुळे आगामी स्पर्धांवरही टांगती तलवार आहे.

1 / 5
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित करण्यात आला. बायो बबलमध्ये असतानाही खेळाडूंना कोरोनाने गाठलं. त्यामुळे बीसीसीआयने 4 मे ला स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या कोरोनामुळे अनेक क्रीडा स्पर्धा या अनिश्चित काळासाठी रद्द कराव्या लागू शकतात. विशेष म्हणजे भारतात होणाऱ्या स्पर्धांवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

2 / 5
पुढील म्हणजेच 18  जूनपासून टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात इंग्लंडमध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा थरार रंगणार आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनसह अनेक खेळाडू हे भारतात आहेत. हे खेळाडू काही दिवसात इंग्लंडला रवाना होतील. तसेच टीम इंडियाही मे महिन्याअखेरीस इंग्लंडला रवाना होईल. ब्रिटेनमध्ये भारतातून येणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामन्यावर परिणाम होऊ शकतो.

3 / 5
या कोरोनाचा टोक्यो ऑलिम्पिकला फटका बसू शकतो. या स्पर्धेचं आयोजन  23 जुलै ते 8 ऑगस्टपर्यंत करण्यात आले आहे. मात्र स्पर्धेच्या आयोजनावर कोरोनाचे सावट आहे. त्यात भारतीय क्रीडापटूंसाठी धोक्याची घंटा आहे. कारण देशातील परिस्थितीमुळे त्यांना सराव करणं आणखी आव्हानात्मक झालं आहे. कोरोनाचा जोर असाच राहिला तर भारतीय खेळाडूंना या स्पर्धेत प्रवेश नाकारला जाण्याची शक्यता आहे.

4 / 5
PHOTO | कोरोनामुळे IPL 2021 चा बाजार उठला, ‘या’ स्पर्धांवरही धोका कायम, भारताला यजमानपद गमावावं लागणार?

5 / 5
भारतात 2021 अखेरीस ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे ही स्पर्धा दुसऱ्या देशात खेळवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. कोरोनामुळे स्पर्धा भारतातून दुसऱ्या देशात खेळवण्याच्या दृष्टीने आयसीसीची चाचपणी सुरु आहे. मात्र या वर्ल्ड कप स्पर्धेंच यजमानपद गमावणं हे बीसीसीआयसाठी नुकसानकारक ठरु शकतं.