
लंडनमध्ये कोरोनाच्या रुणांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचं संक्रमण लक्षात घेता आता नागरिकांवर निर्बंध लावण्यात आले आहेत.अश्या परिस्थितीत ब्रिटिश राजधानीत होणाऱ्या सहा प्रीमियर लीगमध्ये प्रेक्षकांना स्टेडियमवर परवानगी नाकारण्यात आली आहे.

ब्रिटिश सरकारचा हा नवा नियम बुधवारपासून लागू होणार आहे. त्यामुळे आता फक्त 4 क्लबचे प्रेक्षकच म्हणजे एव्हर्टन, लिव्हरपूल, ब्राइटन आणि साउथॅम्प्टन या क्लब्सचे प्रेक्षक स्टेडियममध्ये येऊ शकणार आहेत. त्यातसुद्धा फक्त 2000 प्रेक्षकांची परवानगी देण्यात आली आहे.

एव्हर्टन, लिव्हरपूल, ब्राइटन आणि साउथॅम्प्टन या क्लब व्यतिरिक्त कुठल्याही क्लबच्या प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येता येणार नाही.

'शहरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सरकारनं हा निर्णय घेतला आहे. लंडनमध्ये कोरोना पुन्हा वेगानं पसरत आहे आणि बर्याच ठिकाणी दर सात दिवसांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे.' असं लंडनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी सांगितलं आहे.