
अभिनेत्री अभिज्ञा भावेचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. या सोहळ्यासाठी कलाविश्वातील अनेक पाहुण्यांनी हजेरी लावली.

या कलाकारांमध्ये चर्चा रंगली ती म्हणजे अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता ऋषी सक्सेनाची. या दोघांनी या सोहळ्याला सोबत हजेरी लावली.

सोशल मीडियावर ईशा आणि ऋषी मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असतात. त्यांचे अनेक फोटोसुद्धा ते सोशल मीडियावर शेअर करत असतात.

आता अभिज्ञाच्या लग्नातील काही सुंदर फोटो ईशानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अभिनेत्री ईशा केसकर या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.