
नेहा कक्कर आणि पंजाबी गायक रोहनप्रीत ही जोडी सध्या सोशल मीडियावर धमाल करतेय. दोघांच्या प्रेमाची झलक ते सोशल मीडियावर शेअर करत असतात.

हे दोघंही नेहमी एकमेकांना आनंदी करण्यासाठी नवनवीन गोष्टी करत असतात. आता रोहनप्रीतनं नेहासाठी काही फोटो शेअर करत आणि खास कॅप्शन देत इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. या पोस्टवर नेहा खूप आनंदी झालेली पाहायला मिळाली.

नेहा सध्या ‘इंडियन आयडल’ या कार्यक्रमासाठी परिक्षकाची भूमिका साकारतेय. ‘इंडियन आयडल’च्या सेटवर नेहा धमाल करताना दिसतेय.

याशिवाय नुकतंच नेहाचं ‘मरजानेया’ हे गाणं रिलीज झालं आहे. याच गाण्याच्या सेटवर रोहनप्रीत आणि नेहानं रोमँटिक फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये दोघंही प्रचंड आनंदी दिसत आहेत.

हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दोघांच्याही चाहत्यांना हे फोटो पसंतीस उतरले आहेत.