
कधी कोणाला कशाची इच्छा होईल काहीही सांगता येत नाही. सध्या एक जोडी त्यांच्या अशाच वेगळ्या इच्छेमुळे चर्चेत आली आहे. संपूर्ण जगभरात त्यांच्या या इच्छेची जोरदार चर्चा रंगली आहे. एका महिलेला आपल्या जोडीदारासोबत थेट हवेत स्काय डायव्हींग करताना सेक्स करण्याची इच्छा झाली. मात्र, या इच्छेची मोठी किंमत महिलेच्या जोडीदाराला नंतर चुकवावी लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये राहणाऱ्या William आणि Leslie यांनी आम्ही सेक्च्यूअली अॅक्टिव्ह असल्याचे कबुल केलेले आहे. जेव्हा जेव्हा सेक्सचा विषय येतो; तेव्हा प्रत्येक वेळी मी वेगवेगळ्या प्रकारे सेक्स करण्याचा विचार करते, असं Leslie ने सांगितलंय.

याच वेगवेगळ्या प्रकारे सेक्स करण्याचा कल्पनेपोटी Leslie ने थेट स्काय डायव्हींग करताना सेक्स करण्याची कल्पना William समोर मांडली. त्यानंतर William ला सुद्धा ही कल्पना चांगली वाटल्यांतर दोघांनीही हवेत भरारी घेताना सेक्स करण्याचे ठरवले.

दोघांचे एकमत झाल्यानंतर त्यांनी एका स्काय डायव्हिंग क्लबशी संपर्क साधला. त्यानंतर स्कायडायव्हिंग करण्याआधी या कपलने विमानात बसल्यानंतर एकमेकांना किस करण्यास सुरुवात केली. दोघेही एकमेकांत गुंतल्यानंतर त्यांनी विमानातून उडी घेतली. आणि ठरल्याप्रमाणे हवेतून भरारी घेत असताना त्यांनी सेक्स करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर स्काय डायव्हिंग दरम्यान सेक्स करताना ते एकमेकांत पुरते गढून गेले. सेक्स करताना William ची नजर अचानकपणे जेव्हा जमिनीकडे गेली तेव्हा मात्र सेक्स करण्याच्या वेडापायी आपल्यासमोर काय वाढून ठेवलं आहे, हे त्याला समजले.

काही क्षणांत ते दोघेही जमिनीवर पडणार असल्याचे लक्षात आल्यानंतर William ने Leslie चे पॅराशूट गडबडीत उघडले. यामुळे Leslie तर बचावली मात्र स्वत:चे पॅराशूट थोड्या उशिराने उघडल्यामुळे William थेट जमिनीवर आदळला. एवढ्या उंचावरुन अगदीच जोरात जनिमीवर अदळल्यामुळे William ला जबर मार लागला. या घटनेत त्याचे नाक तुटले

दरम्यान, खाली उतरल्यानंतर Leslie ने William कडे धाव घेतली. त्याला रुग्णालयात दाखल केलं. या अपघाताविषयी बोलताना जमिनीवर जोरात आदळल्यामुळे William च्या शरीरात अंतर्गत अनेक ठिकाणी मार लागला आहे. तसेच, William चे नाकसुद्धा तुटले आहे, असे डॉक्टरांनी सांगितलं आहे. हा अपघात झाल्यामुळे आगामी काळात William ला काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच, डॉक्टरांनी हा सल्ला दिल्यामुळे आपल्या सेक्स लाईफबद्दलसुद्धा काळजी वाटत असल्याचे William सांगतोय.