Photo Gallery: अहो खरंच का… गायीच्या पोटी जुळ्या वासरांची जोडी, गाव म्हणतंय मारुतीरायाच्या सेवेचा प्रसाद!

| Updated on: Mar 07, 2022 | 11:51 AM

नांदेड : आतापर्यंत शेळीने एकपेक्षा अधिक करडांना जन्म दिल्याचे तुम्ही पाहिले असेल पण गायीने जुळ्या वासरांना जन्म वाटतयं ना अवास्तव पण हे खरे आहे. अहो खरंच गायींना जुळ्या वासरांना जन्म तर दिलाच पण दोन्ही हुबेहुबच अगदी जुळेच. जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील बरडा येथे हा प्रकार घडला असून एकाच रंगाची आणि ते ही नर जातीचीच. आता याचे कुतूहल तर शेतकऱ्यांना राहणारच. त्यामुळे रविवारचा दिवस उजाडल्यापासून या जुळ्या वासरांना पाहण्यासाठी गर्दी केली जात होती.गावातील संतराम सुवर्णकार यांच्या गाईने या जुळ्या वासरांना जन्म दिला आहे.संतराम सुवर्णकार यांना तीन एकर जमीन असून,या शेतीवरच ते आपला उदरनिर्वाह करतात.त्यांनी गावातील हनुमान मंदिराची आयुष्यभर सेवा केली. त्याचाच हा प्रसाद असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

1 / 5
शेतीवरत उदरनिर्वाह :संतराम सुवर्णकार यांना तीन एकर जमीन असून,या शेतीवरच ते आपला उदरनिर्वाह करतात. आता शेती व्यवसायाला दूध व्यवसयाची जोड मिळणार आहे. मात्र, गायींने जुळ्या वासरांना जन्म दिल्याची चर्चा पंचक्रोशीत रंगली आहे.

2 / 5
अशा घटना क्विचतच : गायीने जुळ्या वासरांना जन्म देणे अशा घटना क्वचितच घडतात. असे झाले तरी वासरांना धोका असतो पण ही दोन्ही वासरे ही सदृढ आहेत. आता शेतकऱ्यांने यांची व्यवस्थित निघराणी करणे गरजेचे आहे. शिवाय दोन्ही नर असल्याने शेतकऱ्याला याचा अधिकचा फायदा होणार असल्याचे पशूवैद्यकीय अधिकारी केंद्रे यांनी सांगितले आहे.

3 / 5
वासरांना पाहण्यासाठी गर्दी : सुवर्णकार यांच्या गायीने दोन वासरांना जन्म दिला ही गोष्ट अवघ्या काही वेळेत पसरली. मग काय जे हौशे शेतकरी आहेत त्यांनी नेमकी वासरांचा तब्येत कशी आहे? कसंकाय हे शक्य झाले हे पाहण्यासाठी थेट संतराम सुवर्णकार यांचे घर गाठले.

4 / 5
दोन्हीही हुबेहुब:  रविवारी सकाळच्या दरम्यान या गाईने वासरांना जन्म दिला असून,ही दोन्ही वासरे एकाच रंगांची आणि नर जातीची आहेत.गाईचे वय पाच वर्ष असून,बांधा सरळ आहे.तर ही दुसरी वेत असल्याची माहिती सुवर्णकार कुटुंबांनी दिली आहे.

5 / 5
अख्खं कुटुंब हनुमंताच्या सेवावृतीमध्ये : सुवर्णकार कुटुंबियांनी गावातील हनुमान मंदिराची आयुष्यभर सेवा केली.त्यांच्या आईने देखील हनुमंताची मनोभावे सेवा केली होती.आता संतराम सुवर्णकार हे शरीराने थकले असले तरी त्यांचं अख्ख कुटुंब या मंदिराची नित्य नियमाने दररोज पूजापाठ करीत असते.याचाच प्रसाद त्यांना मिळाला असल्याची भावना गावातल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.