
क्रेडिट कार्डची थकबाकी कार्डधारकाच्या अचानक मृत्यूनंतर माफ होत नाही. पण जर या क्रेडिट कार्डला विम्याचे संरक्षण असेल तर बँक अशी वसूली करत नाही. पण विमा नसेल तर मग बँकेचे कर्मचारी सदर रक्कम भरण्यासाठी संपर्क करू शकतात. त्यासाठी एक प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. ही कटकट नसावी यासाठी काही बँका आता क्रेडिट कार्डसोबत विमा पण देतात.

या विम्यामुळे अचानक जर क्रेडिट कार्डधारकाचा मृत्यू झाला तर त्याची जी रक्कम आहे, ती विमा कंपनी जमा करते आणि क्रेडिटवरील थकबाकी शून्य होते. कार्ड घेताना विमा खरेदी करावा लागतो. विमा रक्कम ही क्रेडिट कार्डची जी लिमिट असते तितकी असते. त्यानुसार विम्याची रक्कम ठरते. त्यामुळे थकबाकीची रक्कम कुटुंबाला भरावी लागत नाही.

या विमा संरक्षणासाठी कार्डधारकाला एक ठराविक प्रिमियम दरवर्षी द्यावा लागतो. त्यामुळे जर कार्डधारकाचा मृत्यू झाला तर विमा कंपनी थेट बँकेत पेसे जमा करतो. त्यामुळे कुटुंबाला वसूलीचे कोणतीची चिंता उरत नाही. व्याज आणि त्यावरील अतिरिक्त शुल्क वसूल केल्या जात नाही.

पण विमा घेताना काय काय मदत होणार आणि काय नियम आहेत हे समजून घ्यावे लागेल. इन्शुरन्स घेताना अगोदर तुमचा काय फायदा होईल हे पण समजून घ्या. विमा कंपनी थेट बँकेत पैसा जमा करणार की नाही हे पण तपासा. तसेच विमा कंपनीचा क्लेम क्लिअरन्सची आकडेवारी माहिती करून घ्या.

काही बँका याप्रकराचे विमा संरक्षण क्रेडिट कार्डवर देत आहेत. एक लाखांच्या रक्कमेवर जवळपास वार्षिक 500 रुपये तर त्यापेक्षा अधिकच्या विम्यावर एक हजारांपेक्षा अधिकची रक्कम मोजावी लागते. पण यामुळे ऐनवेळीच्या मोठ्या दुर्घटनेवेळी कुटुंबाला कोणताही त्रास होत नाही.

या क्रेडिट कार्ड विम्यामुळे कुटुंबावर अतिरिक्त बोजा येत नाही. क्रेडिट कार्डवरील चक्रवाढ व्याज थांबते, अतिरिक्त शुल्क आकारल्या जात नाही. टर्म इन्शुरन्स पेक्षा हा विमा स्वस्त पडतो आणि त्याचे फायदे पण आहेत. तेव्हा बँकेकडे क्रेडिट कार्ड घेताना विमा संरक्षणाची माहिती घ्या.