Credit Card: कोणत्या कामांसाठी क्रेडिट कार्ड वापरू नये? जाणून घ्या

Credit Card Use: जर तुम्हाला अगोदरच माहिती असेल की क्रेडिट कार्डचा कुठेही वापर करू नये तर तुमचे होणारे नुकसान टळू शकते. त्यामुळे क्रेडिट कार्ड आहे म्हणजे त्याचा वारेमाप वापर करणे टाळा. या ठिकाणी तर क्रेडिट कार्डचा वापर बिलकूल करू नका.

| Updated on: Nov 29, 2025 | 4:12 PM
1 / 6
क्रेडिट कार्ड जितके फायद्याचे तितके नुकसानदायक सुद्धा ठरते. जर तुम्ही त्याचा स्मार्टली वापर केला तर खिसा रिकामा व्हायला वेळ लागणार नाही. काही अशी ठिकाणं आहेत. जिथं क्रेडिट कार्डचा वापर न करणे फायद्याचे ठरते. नाहीतर मोठे नुकसान होईल.

2 / 6
क्रेडिट कार्ड खरेदीवर चांगली ऑफर्स, कॅशबॅक, रिवॉर्ड्स मिळत असतील तर जरुर वापर करा. पण गरज नसताना आणि कोणताही फायदा नसताना अनावश्यक खर्च करत असाल तर क्रेडिट कार्डचा वापर लागलीच बंद करा. यामुळे तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढेल.

3 / 6
क्रेडिट कार्ड वापरताना नेहमी एक काळजी घ्या. क्रेडिट कार्डचा वापर हा महिन्याकाठी 30 टक्क्यांपेक्षा अधिक व्हायला नको हे पाहा. त्यामुळे तुम्हाला वेळेच्या आता क्रेडिट कार्डचे पेमेंट करता येईल.

4 / 6
क्रेडिट कार्डचा वापर प्रामाणित आणि योग्य ठिकाणीच करा. कोणत्याही वेबसाईटवर जाऊन काहीही खरेदी करु नका. नाहीतर तुम्ही एखादा स्कॅमचा शिकार होऊ शकतात. असुरक्षित वेबसाईटचा वापर अजिबात करू नका.

5 / 6
जर सार्वजनिक वायफायचा वापर करत असाल तर अशावेळी क्रेडिट कार्डचा अजिबात वापर करू नका. ऑनलाईन स्कॅमर्सला तुम्ही आवताण तर देत नाही ना याची काळजी घ्या. कारण हे स्कॅमर्स तुमच्या सर्व पैशांवर डल्ला मारतील.

6 / 6
क्रेडिट कार्ड डाऊन पेमेंट करत असाल आणि उर्वरीत रक्कम हप्त्याने चुकती करत असाल तर अधिक जागरूक राहा. कारण एक हप्ता मागे पुढे झाला तर तुम्हाला क्रेडिट कंपन्या, बँका व्याजाचा मोठा दणका देतात. एकदा का चक्रव्याढ व्याजाच्या फेऱ्यात अडकलात तर मग पुढे मोठे अवघड होते.