VIRAT KOHLI एका जाहिरातीसाठी किती पैसे घेतो ? सोशल मीडिया पोस्टमधून किती होते कमाई ?
क्रिकेट मैदान गाजवणारा विराट कोहली मैदानावरील विविध रेकॉर्ड्ससाठी प्रसिद्ध आहे. तो आता एक ग्लोबल ब्रँड आणि यशस्वी बिझनसमन झाला आहे.त्याची अंदाजित नेटवर्थ, एका जाहिराती मागची फी, सोशल मीडियातील कमाई आणि लक्झरी कार कलेक्शनसंदर्भात माहिती घेऊयात..

अनेक कंपन्यांना विराट कोहली याने आपल्या ब्रँडचा चेहरा बनावा असे वाटते.मग क्रिकेटस्टार विराटची कमाई किती असा प्रश्न पडतो आणि एका जाहिरातीतून तो नेमका किती पैसा कमावतो असा प्रश्नही चाहत्यांना पडत असतो.
बिझनस आऊटरीच पोर्टलनुसार जून 2024 पर्यंत विराट कोहली याची अंदाजित संपत्ती सुमारे 1,050 कोटी रुपये होती.केवळ क्रिकेटच हा त्याच्या कमाईचा मार्ग नही. मॅच फी आणि IPL मॅच फी आणि जाहिराती, आता सोशल मीडिया पोस्ट, ब्रँड पार्टनरशिप आणि बिजनसमध्ये गुंतवणूकही केल्याने त्याची कमाई प्रचंड मोठी आहे.
विराट कोहलीला भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)कडून 3 कोटी रुपये मिळतात. वनडे मॅचची फी सुमारे 6 लाख रुपये आहे. टेस्ट आणि टी- 20 इंटरनॅशनलमधून संन्यास घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय कमाई मुख्य रूपाने वनडे क्रिकेटमधून होते.
आयपीएल देखील विराट कोहली याच्या कमाईचा मोठा हिस्सा आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु (आरसीबी) मधून एका सिझनसाठी सुमारे 21 कोटी रुपये मिळतात.
विराट कोहली याला एका जाहिराती मागे सुमारे 5 ते 10 कोटी रुपये मिळतात.ही रक्कम प्रत्येक जाहिरातीनुसार बदलते. ब्रँड, जाहिरातीचा प्रकार, कँपेनचा कालावधी आणि विराटची भूमिका त्यानुसार फीमध्ये बदल होऊ शकतो.
बंगलुरुच्या एका ट्रेडिंग आणि इन्वेस्टिंग कंपनी स्टॉकग्रोच्यानुसार, विराट कोहली इंस्टाग्रामवर एका प्रमोशनल पोस्टसाठी सुमारे 8.9 कोटी रुपय घेतो. तसेच एक्सच्या एका पोस्टसाठी त्याची कमाई सुमारे 2.5 कोटी रुपये सांगितली जाते. हे आकडे अंदाजे आहेत.
विराट कोहलीने आपली कमाई केवळ जाहिरातीपर्यंत मर्यादित नाही. त्यांनी स्वत: ब्रँड सुरु करण्यासाठी वेगवेगळ्या बिझनसमध्ये गुंतवणूक केली आहे. त्याच्या चर्चित ब्रँडमध्ये One8 आणि WROGN चा समावेश आहे.
विराट कोहली याच्याकडे ऑडी, बेंटले आणि लँड रोव्हर सारख्या लक्झरी ब्रँडची कार आहे. त्याच्या कलेक्शन ऑडी R8 LMX, ऑडी R8 V10 प्लस, ऑडी RS5 कूपे आणि ऑडी Q8 सारखे कार सामील आहेत.विराटने कार जुन्या झाल्याने विकल्या आहेत.
विराट कोहलीची कहानी केवळ एक शानदार क्रिकेट करिअरची कहानी नव्हे. क्रिकेटमधून लोकप्रियता मिळाल्याने त्याला बिझनस आणि ब्रँडिंगच्या जगात ओळख मिळाली आहे.जगात मोठ्या ग्लोबल स्पोर्ट्स ब्रँडच्या रुपात त्याची ओळख मिळाली आहे.