
पती-पत्नीचं नातं हे अतिशय पवित्र मानलं जातं. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पती-पत्नी एकमेकांना साथ देतात, असं म्हटलं जातं. मात्र या विश्वासाला तडा बसेल अशी एक घटना समोर आली आहे. एका पतीने दुबईहून परतताच आपल्या पतीचा जीव घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना कर्नाकट राज्यातील बंगळुरूमधील उल्लाल येथील आहे. इथे एका व्यक्तीने रविवारी (28 सप्टेंबर) आपल्यी पत्नीची हत्या केली आहे. त्यानंतर त्याने स्वत:लादेखील संपवून घेतलं आहे. या दोघांचेही 2022 सालातील सप्टेंबर महिन्यात लग्न झाले होते.

मृत महिला 27 वर्षांची होती. तिचे नाव मंजू असे होते. तर मंजूला ठार करून आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव धर्मशीलम असे होते. तो 30 वर्षांचा होता. तो नुकताच दुबईहून आपल्या पत्नीकडे परतला होता.

मृत मंजूच्या वडिलांनी पेरियास्वामी यांनी रात्री आम्हाला साधारण साडे नऊ वाजता दोघांचेही मृतदेह आढळले, असे सांगितले. मंजू बेडवर मृतावस्थेत होती. तिच्या शरीरावर चाकूने वार करण्यात आले होते.

तर मृत धर्मशीलम याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. मृत पती-पती दोघेही उल्लामच्या मुख्य रस्त्यावर भाड्याने खोली घेऊन राहात होते. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून धर्मशीलम याने आपल्या पत्नीला नेमके का मारले याचा शोध घेतला जात आहे.