AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिनच्या लेकाच्या लग्नात खास पाहुण्यांची मांदियाळी… Video मध्ये कैद झालेत कधीही न विसता येणारे क्षण

Arjun Tendulkar and Saania Chandhok Marriage: अर्जुन तेंडुलकर याने सानिया चंडोक हिच्यासोबत लग्न केलं. सध्या त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण त्यामध्ये काही व्हिडीओ असे आहेत, जे कधीच विसरता येणार नाहीत...

सचिनच्या लेकाच्या लग्नात खास पाहुण्यांची मांदियाळी... Video मध्ये कैद झालेत कधीही न विसता येणारे क्षण
Arjun Tendulkar and Saaniya Chandhok Marriage
| Updated on: Mar 06, 2026 | 1:28 PM
Share

Arjun Tendulkar and Saania Chandhok Marriage: भारतीय क्रिकेट संघाचे माजी स्टार फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचं लग्न झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अंर्जुन आणि सानिया यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अर्जुन आणि सानिया यांच्या लग्नात बॉलिवूड सेलिब्रिटी, उद्योजक, क्रिकेट अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती… अभिनेता शाहरुख खान देखील पत्नी गौरी खान आणि लेक सुहाना खान यांच्यासोबत पोहोचला. तर पाहुण्यांच्या गर्दीत अभिनेता आमिर खान याला किंग खान याच्यासोबत बोलताना स्पॉट करण्यात आलं… सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त शाहरुख आणि त्याच्या कुटुंबाच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

अर्जुन याच्या लग्नात शाहरुख खान याने पारंपरिक लूकमध्ये एन्ट्री केली. तर आमिर खान याने लाल रंगाच्या कुर्त्याला पसंती दिली… लग्नाच्या हॉलमधून बाहेर आल्यानंतर शाहरुख आणि आमिर यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं… तेव्हात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एन्ट्री झाली. संपूर्ण कुटुंबासोबत राज ठाकरे यांनी अर्जुन याच्या लग्नात हजेरी लावली… व्हिडीओमध्ये राज ठाकरे त्यांच्या कुटुंबियांसोबत दिसत आहेत.

अर्जुन-सानियाच्या लग्नात, गौरी खानने सोनेरी साडी नेसली होती, जी तिने कमीत कमी दागिन्यांसह आणि सॉफ्ट ग्लॅम मेकअपने सजवली होती, अशा रॉयल लूकमध्ये गौरी हिला स्पॉट करण्यात आलं. तर सुहाना हिने देखील आईसोबत मॅचिंग केलं होतं… सांगायचं झालं तर, गौरी आणि सुहाना कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात.

अर्जुन आणि सानिया यांच्या लग्नात दिग्गजांची मांदियाळी…

अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांच्या लग्नाला अमिताभ बच्चन, जया, अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन तसेच चित्रपट निर्माते विधू विनोद चोप्रा यांच्यासह अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी उपस्थित होते. धोनी, राहुल द्रविड, युवराज सिंग, अनिल कुंबळे, वेंकटेश प्रसाद आणि इतर अनेक क्रिकेट दिग्गजांनीही या लग्न सोहळ्याला हजेरी लावली. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा विवाह 5 मार्च रोजी मुंबईत झाला. हा भव्य समारंभ मुंबईतील आलिशान द सेंट रेजिस येथे झाला.

Follow Us
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश