AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Gavaskar : त्याला पाहून असं वाटतं होतं की तो..संजू सॅमसन बद्दल बोलताना सुनील गावस्कर काय म्हणाले?

Sunil Gavaskar : टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताने काल उपांत्यफेरीत बलाढ्य इंग्लंडला 7 धावांनी नमवलं. आता फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. सुनील गावस्कर यांनी भारताच्या विजयाचं कसं विश्लेषण केलय?

Sunil Gavaskar : त्याला पाहून असं वाटतं होतं की तो..संजू सॅमसन बद्दल बोलताना सुनील गावस्कर काय म्हणाले?
sunil Gavaskar
| Updated on: Mar 06, 2026 | 1:37 PM
Share

वेस्ट इंडिज प्रमाणे इंग्लंड विरुद्ध सुद्धा संजू सॅमसनची बॅट तळपली. सेमीफायनलच्या महत्वाच्या सामन्यात संजूने जबरदस्त प्रदर्शन केलं. त्याच्या या खेळाचं भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी भरभरुन कौतुक केलय. संजू सॅमसनकडे पाहून असं वाटतं होतं की, तो कुठल्या दुसऱ्या ग्रहावर बॅटिंग करतोय असं सुनील गावस्कर इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले. संजू सॅमसनने 42 चेंडूत 89 धावा फटकावल्या. त्यामुळे टीम इंडियाला 7 बाद 253 धावांपर्यंत मजल मारता आली. वानखेडे स्टेडियमवर काल हा सामना झाला. टीम इंडियाने इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला. आता न्यूझीलंड विरुद्ध रविवारी फायनल होईल. सामन्यानंतर बोलताना गावस्कर यांनी संजूच्या खेळाचं कौतुक केलं.

“तो वेगळ्या ग्रहावर फलंदाजी करत होता, असं तुम्ही म्हणू शकता. त्याला ग्रहासारखाच चेंडू मोठा दिसत असावा. त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी स्पष्ट होत्या. त्याचा स्ट्रोक प्ले उत्तम होता. ड्राईव्हचे फटके मैदानालगत जात होते. कट आणि पुलचे शॉट त्याने उत्तम मारले. त्याने सुंदर, कलात्मक फलंदाजीचं प्रदर्शन केलं” असं सुनील गावस्कर संजू सॅमसनच्या खेळीच कौतुक करताना म्हणाले.

असे शॉट क्वचित दिसले असतील

“टी20 क्रिकेटमध्ये बरेच क्रॉस बॅटचे फटके पहायला मिळतात. फलंदाजीची शुद्धता क्वचित पहायला मिळते. स्लॉग आणि चाबकासारखे फटके जास्त दिसतात. पण संजूच्या बॅटिंगमध्ये तुम्हाला असे शॉट क्वचित दिसले असतील. कोलकातामध्ये अशीच फलंदाजी पहायला मिळाली आणि इथे सुद्धा तशीच फलंदाजी होती” असं सुनील गावस्कर म्हणाले.

त्या दोघांनी गावस्करांचा विश्वास सार्थ ठरवला

या मॅचआधी सुनील गावस्कर यांनी दोन खेळाडूंबद्दल विश्वास व्यक्त केला होता. त्यांनी इंग्लंड विरूद्धच्या महत्वाच्या सामन्यात तशीच कामगिरी केली. एक म्हणजे जसप्रीत बुमराह आणि दुसरा होता तिलक वर्मा. बुमरहाने काल मोक्याच्या क्षणी चांगली ओव्हर टाकून इंग्लंडच्या धावगतीला लगाम घातला तेच तिलक वर्माने तिलक वर्माने 7 चेंडूत 21 धावा चोपल्या. या दोघांची कामगिरी टीम इंडियाच्या विजयात निर्णायक ठरली. त्यामुळे सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरला.

Follow Us
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Kunbi Certificate Update | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय