AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीतून मोठी बातमी! कनॉट प्लेसमधील दुकाने 6.30 वाजता बंद होणार, NDMC कडून आदेश जारी

Delhi Protest Update : दिल्लीतील कनॉट प्लेस परिसरातील सर्व दुकाने, कार्यालये आणि रेस्टॉरंट्स आज (गुरुवार) सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत बंद करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

दिल्लीतून मोठी बातमी! कनॉट प्लेसमधील दुकाने 6.30 वाजता बंद होणार,  NDMC कडून आदेश जारी
connaught place shops shut newsImage Credit source: Google
| Updated on: Jul 23, 2026 | 4:52 PM
Share

राजधानी दिल्लीत गेल्या एका महिन्यापासून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू आहे. मात्र गेल्या काही काळापासून दिल्लीतील आंदोलनाला वेगळे वळण लागले आहे, त्यामुळे दिल्लीच्या काही भागात तणावाचे वातावरण सुरू आहे. अशातच आता दिल्लीतील कनॉट प्लेस परिसरातील सर्व दुकाने, कार्यालये आणि रेस्टॉरंट्स आज (गुरुवार) सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत बंद करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नवी दिल्ली ट्रेडर्स असोसिएशन (NDTA)ने याबाबत परिपत्रक जारी केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

NDTA कडून अधिसूचना जारी

नवी दिल्ली महानगरपालिकेच्या अध्यक्षा आणि उपाध्यक्षा यांनी दूरध्वनीवरून दिलेल्या सूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आला. कनॉट प्लेस परिसरातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता सर्व व्यावसायिक आस्थापनांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. NDTA ने आपल्या परिपत्रकात सर्व दुकानदार, कार्यालये आणि रेस्टॉरंट चालकांना सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत आपली दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी, मालमत्तेचे नुकसान किंवा कोणालाही दुखापत होऊ नये यासाठी या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

NDTA चे अध्यक्ष अतुल भार्गव यांनी जारी केलेल्या या परिपत्रकात सर्व व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करून सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे म्हटले आहे. या निर्णयामागचा उद्देश नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि कोणत्याही प्रकारचे नुकसान टाळणे हा असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. जंतर-मंतर परिसरात कॉकरोच जनता पार्टीकडून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दिल्ली पोलिसांनी काय म्हटले?

कनॉट प्लेसमधील दुकाने वेळेआधी बंद करण्याच्या सूचनेदरम्यान राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत दिल्ली पोलिसांच्या प्रतिबंधात्मक नजरकैदेच्या अधिकारात वाढ करण्यात आली आहे. दिल्लीचे उपराज्यपाल यांनी दिल्ली पोलिसांना NSA अंतर्गत प्रतिबंधात्मक नजरकैदेचे अधिकार 18 ऑक्टोबरपर्यंत वाढवून दिले आहेत. मात्र, दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे की हा निर्णय CJP च्या आंदोलनाला दडपण्यासाठी घेतलेला नाही. पोलिसांच्या मते ही एक नियमित प्रशासकीय प्रक्रिया आहे. काही माध्यमांनी या आदेशाचा संबंध सध्याच्या आंदोलनाशी जोडत चुकीचा संदर्भ दिल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा