AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मला अनफॉलो करा पण..’, CJP च्या आंदोलनावर अंकिता वालावलकरची प्रतिक्रिया, म्हणाली- ‘त्यावेळी तुम्ही…’

देशभरात सध्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची जोरदार चर्चा आहे. अनेक कलाकारांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे. अशातच अंकिता वालावलकरने देखील तिची भूमिका स्पष्ट केली आहे.

'मला अनफॉलो करा पण..',  CJP च्या आंदोलनावर अंकिता वालावलकरची प्रतिक्रिया, म्हणाली- 'त्यावेळी तुम्ही...'
| Updated on: Jul 23, 2026 | 5:03 PM
Share

NEET पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात विद्यार्थ्यांकडून निषेध व्यक्त केला जात असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीसह देशभरात अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिस आणि आंदोलक यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे तसेच काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणावर अनेक कलाकारांनी आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपापल्या भूमिका मांडल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर ‘बिग बॉस मराठी’ फेम आणि ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अंकिता वालावलकर हिने केलेली सोशल मीडिया पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याऐवजी तिने निवडक घटनांवर होणाऱ्या आंदोलनांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

काय म्हणाली अंकिता वालावलकर?

अंकिता वालावलकरने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर करत लिहिले की, जर कोणत्याही आंदोलनामागे राजकीय हेतू नसेल, तर समाजातील इतर गंभीर घटनांवरही तितक्याच मोठ्या प्रमाणात आवाज उठायला हवा. तिने नसरापूर येथे घडलेल्या एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणाचा उल्लेख करत, त्या वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर का उतरले नाहीत, असा सवाल उपस्थित केला.

तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, काही घटनांमध्ये हजारो लोक आंदोलन करतात तर काही प्रकरणांमध्ये शांतता का असते, याचा विचार होणे गरजेचे आहे. प्रत्येक पीडितेला समान न्याय मिळाला पाहिजे आणि कोणत्याही घटनेकडे निवडकपणे पाहू नये असे मत तिने व्यक्त केले.

याशिवाय, समाजात द्वेष किंवा तेढ निर्माण करणाऱ्या भडकाऊ पोस्ट टाळण्याचे आवाहन करत, शांतता राखण्याचेही तिने नागरिकांना आवाहन केले. तसेच, माझ्या मताशी सहमत नसाल तर मला अनफॉलो करू शकता असेही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Ankita Walavalkar on CJP Protest: 'अनफॉलो करा पण...', CJP आंदोलनावरून अंकिता वालावलकर स्पष्टच बोलली, म्हणाली, 'प्रत्येक जण आपापली पोळी भाजून...

अनेक कलाकारांनी आंदोलनाला दिला पाठिंबा

दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या मागण्यांना अनेक कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे. रितेश देशमुख, प्रीती झिंटा, अरमान मलिक, सोनू सूद, स्वरा भास्कर आणि सोनाक्षी सिन्हा यांनीही सोशल मीडियावर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करत पारदर्शक चौकशी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याची मागणी केली आहे.

अंकिता वालावलकरच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नेटकऱ्यांनी तिच्या मताचे समर्थन केले असून, सर्वच गंभीर घटनांवर समान तीव्रतेने आवाज उठला पाहिजे असे मत व्यक्त केले. तर काहींनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत तिच्या भूमिकेवर टीका केली आहे.

Follow Us
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम, 21 फेऱ्यांनंतर निकाल जवळपास निश्चित
कौस्तुभ गावडेंनी टीकेला दिलं उत्तर; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी
Kaustubh Gawade : कमी वय, मोठी संधी अन् विजय, कौस्तुभ गावडेंनी टीकेला दिलं उत्तर; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने... शिक्षक नेते...
Maharashtra MLC Election 2026 Result : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने... सचिन सानप काय म्हणाले?
कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर; स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत...
Kaustubh Gawde MLC Result : कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर; स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत गुलालाची उधळण
बॅलेट पेपरवरही महायुतीची आघाडी; भाजपनं विरोधकांना निवडणूक निकालातून...
बॅलेट पेपरवरही महायुतीची आघाडी; भाजपनं विरोधकांना निवडणूक निकालातून दिलं प्रत्युत्तर?
पुणे पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर
जाधव विरुद्ध जाधव; कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष
Pune Padvidhar Matdarsangh Result 2026 : जाधव विरुद्ध जाधव; पुणे पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष
विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव
Maharashtra MLC Result 2026 Complete : विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात मोठा ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव, सानप-गावडे यांच्यात चुरस
पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut : पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर तर....
Marathwada MLC Election Results 2026 : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर, सतीश चव्हाण पिछाडीवर