तुमच्या अंगणात येणारा कावळा किती वर्ष जगतो माहितीये का? खरी माहिती वाचून थक्क व्हाल!

तहानलेल्या कावळ्याची गोष्ट आपण ऐकली आहे, पण हा पक्षी किती काळ जगतो? कावळ्यांचे आयुष्य, त्यांचे म्हातारपण आणि वयानुसार त्यांच्या शरीरात होणारे बदल याबद्दलची सविस्तर आणि रंजक माहिती येथे वाचा.

| Updated on: Apr 05, 2026 | 3:20 PM
1 / 8
आपण लहान असताना सर्वांनीच तहानलेल्या कावळ्याची गोष्ट ऐकली किंवा वाचली आहे. पण तुम्हाला माहितीये का कावळा हा पक्षी केवळ गोष्टीपुरता मर्यादित नसून पक्षांच्या विश्वातील सर्वात बुद्धिमान जीव  म्हणून ओळखला जातो.

2 / 8
पण तुम्ही कधी विचार केलाय का, आपल्या अंगणात रोज दिसणारा हा कावळा नक्की किती वर्षे जगतो आणि तो कधी म्हातारा होतो? नाही ना, आज आपण याबद्दल जाणून घेऊया.

3 / 8
'ब्रिटानिका' आणि विविध पक्षीशास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, कावळ्याचे आयुष्य तो कुठे राहतो यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. जंगलात किंवा शहरात मोकळे राहणारे कावळे साधारणपणे १० ते १५ वर्षे जगतात. या ठिकाणी त्यांना अन्न शोधणे, हवामान आणि शिकारी लोकांपासून स्वतःचा बचाव करावा लागतो.

4 / 8
जर कावळ्याला प्राणीसंग्रहालयात किंवा तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवले, तर ते २० ते ३० वर्षांपर्यंत सहज जगू शकतात. काही दुर्मिळ कावळे तर ४० वर्षही जगतात. साधारणपणे वयाची १० ते १२ वर्षे पूर्ण झाल्यावर कावळ्यामध्ये म्हातारपणाची लक्षणे दिसू लागतात.

5 / 8
कावळा म्हातारा झाल्यानंतर त्याचा झेप घेण्याचा वेग मंदावतो. त्याच्या उडण्याच्या वेगावर परिणाम होतो आणि पूर्वीसारखी चपळता राहत नाही. कावळ्याची ओळख असलेली गडद काळी आणि चमकदार पिसे वयानुसार निस्तेज होऊ लागतात. ती पिसे कमकुवत होतात, गळतात किंवा विखुरतात. यामुळे त्यांना थंडीपासून संरक्षण करणे कठीण जाते.

6 / 8
कावळे म्हातारे झाल्यावर त्यांची दृष्टी कमी होते. त्यामुळे म्हाताऱ्या कावळ्यांना अन्न शोधण्यासाठी बराच वेळ लागतो. अनेकदा ते दुसऱ्यांनी शोधलेल्या अन्नावर किंवा मानवी वस्तीतील उरलेल्या अन्नावर अधिक अवलंबून राहतात.

7 / 8
कावळे हे सामाजिक पक्षी आहेत. म्हातारपणी ते समूहात राहणे पसंत करतात, जेणेकरून त्यांना संरक्षण मिळावे. तथापि, तरुण कावळ्यांच्या तुलनेत त्यांची सक्रियता कमी झालेली असते.

8 / 8
पण शारीरिक ताकद कमी झाली तरी कावळ्याची बुद्धिमत्ता म्हातारपणातही कमी होत नाही. उलट, अनुभवामुळे ते अधिक सावध आणि चतुर बनतात. शत्रूला ओळखणे आणि धोक्याची सूचना आपल्या समूहाला देणे यात म्हातारे कावळे अधिक पटाईत असतात.

Follow Us