D Mart : डी-मार्टमध्ये कमी गर्दी कधी असते? खरेदीसाठी ‘ही’ वेळ सर्वात बेस्ट
डी-मार्टमध्ये गर्दीमुळे शॉपिंगचा अनुभव खराब होत असेल, तर काळजी करू नका! डी-मार्टमध्ये कमी गर्दीत खरेदी करण्याच्या सोप्या टिप्स दिल्या आहेत. या वेळेत गेलात तर कमी गर्दीत शॉपिंगचा आनंद घेता येईल.

आजकाल अनेक लोकांना डी-मार्ट हा खरेदीसाठी उत्तम पर्याय वाटतो. घरातील गरजेच्या , शोभेच्या, दैनंदिन वापराच्या बहुताश वस्तू, तिथे एकाच छताखाली आणि परवडणाऱ्या किमतीत मिळतात. त्यामुळे बरेच लोकं डी-मार्टमध्ये जाऊन शॉपिंग करतात. (All Photos : Social Media)

सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात घरगुती वस्तू उपलब्ध करून देणारे डी-मार्ट हे खरेदीसाठी पसंतीचे ठिकाण बनले असून, तेथे वस्तूंवर विशेष सवलती देखील जाहीर करण्यात येतात.

मात्र डी-मार्टमध्ये जेव्हा जावं, बघावं तेव्हा तिथे खूप गर्दी असते. खरेदीसाठी गर्दी, बिलींगसाठी मोठी रांग तसेच पार्किंगसाठीही बराच वेळ वाट पहात जागा शोधावी लागते. त्यामुळे बऱ्याच जणांना तिथे जाणं नकोस वाटतं.

मग डी-मार्टमध्य शॉपिंगला नेमकं कधी जाव, तिथे कमी गर्दी कधी असते, शॉपिंगसाठी योग्य वेळ नेमकी कोणती? असा प्रश्न अनेकांना पडतो.

महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पगार झाल्यामुळे लोकांच्या हातात पैसा खेळत असतो, त्यामुळे बरेच जण तिथे शॉपिंगसाठी येतात. आरामात शॉपिंग करायचं असेल तर 1 ते 7 तारखेदरम्यान तिथे जाऊ नये. कोणत्याही महिन्याच्या 10 ते 25 तारखेदरम्यान डी-मार्ट मध्ये गेलात तर कमी गर्दी असते.

तसेच डी-मार्टमध्ये खरेदीसाठी जायचं असेल तर योग्य वेळ माहीत असणंही गरजेचं, नाहीतर प्रचंड गर्दीचा सामना करावा लागू शकतो, आणि मनासारखं शॉपिंगही करता येत नाही. सकाळी जेव्हा डी-मार्टचं स्टोअर उघडतं तेव्हा किंवा दुपारच्या वेळेत तिथे गेलात, तुलनेने कमी गर्दी असते. त्यामुळे ही वेळ लक्षात ठेऊन डी-मार्टला तुम्ही शॉपिंगसाठी जाऊ शकता.