
मंगळ ग्रह येत्या 16 जानेवारी रोजी सकाळी 4 वाजून 27 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर मंगळ ग्रह 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 11 वाजून 49 मिनिटांनी मकर राशीत गोचर करेल. मंगळ ग्रहाला लाल ग्रह म्हटले जाते. मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे अनेक राशींवर मोठे संकट येणार आहे. या राशींनी काळजी घेणे गरजेचे आहे.

मेष राशीसाठी मंगळ ग्रहाचे गोचर लाभदायक ठऱणार आहे. प्रगती होण्याची शक्यता आहे. गृहस्ती जीवनात सुख येईल. सरकारी काम पूर्ण होईल. तसेच करिअरमध्येही प्रगती होईल. घरात सोनं ठेवत असाल तर ते लॉकरमध्येच ठेवावे. परंतु या राशीच्या लोकांनी वाईट काळापासून वाचण्यासाठी तापायला ठेवलेल्या दुधावर लक्ष ठेवावे. दूध भांड्याच्या बाहेर येणार नाही, याची काळजी घ्यावी.

वृषभ राशीच्या लोकांसाठीही मंगळ ग्रहाचे गोचर लाभदायक ठरणार आहे. कृषी व्यवसायाला भरभराट येईल. तुम्ही सरकारी नोकर असाल तर प्रमोशन होईल. परंतु या काळात वृषभ राशीच्या लोकांपुढे काही अनपेक्षित संकटं येऊ शकतात. त्यामुळे या काळात भावांच्या मदतीला धावून जा. त्यांची मदत करा.

सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाचे गोचर चांगले लाभदायक ठरणार आहे. आगामी काळात तुमची काही चांगल्या लोकांशी भेट होऊ शकते. तुमचा भाऊ तुमच्या मदतीला धावून येईल. 23 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही आगीपासून सावध राहावे. तसेच आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.