त्याने माझ्या इतकी सणसणीत कानाखाली मारली की मी..; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक अनुभव

आमिर खानच्या 'दंगल' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री फातिमा सना शेखने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला. एका व्यक्तीने तिच्या घरापर्यंत तिचा पाठलाग केला होता. इतकंच नव्हे तर त्याने तिच्या कानाखाली मारली होती.

| Updated on: Jul 11, 2025 | 10:16 AM
1 / 5
अभिनेत्री फातिमा सना शेखने 'दंगल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. या चित्रपटात तिने जितकी धाडसी भूमिका साकारली आहे, तितकीच बिनधास्त ती खऱ्या आयुष्यातही आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फातिमाने तिच्यासोबत घडलेला छेडछाडीचा प्रसंग सांगितला.

2 / 5
'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत फातिमाने तिचा धक्कादायक अनुभव सांगितला. ज्या व्यक्तीने तिची छेड काढली, त्याच व्यक्तीने तिच्यावर हातसुद्धा उचलला होता. ही घटना कोविड महामारीच्या काळातली आहे. जेव्हा फातिमा मास्क घालून रस्त्यावर सायकल चालवत होती.

3 / 5
एका टेम्पोवाल्याने फातिमाचा पाठलाग करायला सुरुवात केली. त्याने तिच्या घरापर्यंत तिचा पाठलाग केला होता. इतकंच नव्हे तर रस्त्यावर अश्लील इशारेही केले. "पुन्हा एकदा अशीच घटना घडली, तेव्हा मी त्याला मारलं होतं. त्यावर त्यानेही मला कानाखाली मारलं होतं. त्याने इतक्या जोरात मारलं होतं की मी खालीच पडले होते", असा खुलासा फातिमाने केला.

4 / 5
याविषयी तिने पुढे सांगितलं, "त्याने अश्लील चाळे केले म्हणून मी त्याला मारलं होतं. परंतु मी त्याच्यावर हात उचलला म्हणून त्याचा अहंकार दुखावला गेला. त्याने उलट माझ्यावर हात उचलला होता. त्या घटनेनंतर मी आणखी सतर्क झाले. कारण तुम्ही कशी प्रतिक्रिया देता, याचाही आता विचार करावा लागेल."

5 / 5
 "विचार करा, आपल्यासोबतच चुकीचं घडतंय आणि आपल्यालाच प्रतिक्रिया कशी द्यायची याचा विचार करावा लागतोय. आपण आपल्याच पद्धतीने प्रतिक्रियासुद्धा देऊ शकत नाही", अशा शब्दांत ती व्यक्त झाली.