
साताऱ्यातील नीरा नदीत पाणी दूषित होऊन प्रदूषणामुळे लाखो मासे मृत्यूमुखी पडले आहेत.

फलटण तालुक्यातील होळ येथे ढगाई माता मंदिराच्या पाठीमागील बंधाऱ्याजवळ आलेल्या सोमेश्वर साखर कारखान्याच्या दूषित मळीयुक्त पाण्यामुळे मागील तीन दिवसांपासून निरा नदी पात्रातील लाखो मासे मृत्युमुखी पडत आहेत.

संपूर्ण नदीच्या पाण्याला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

नदीचे पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे, यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.

मृत झालेल्या माशांमधील १० टन माशांची विक्री झाल्याची चर्चा असून यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.