
बाॅलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने जुना एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पीकू चित्रपटाच्या सेटवरील आहे. यामध्ये दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन आणि इरफान खान दिसत आहेत.

दीपिकाने लिहिले की, त्यांना (अमिताभ बच्चन) यांना हे सांगायला खूप आवडते की, मी किती जास्त खाते. यावेळी इरफान खानबद्दल दीपिकाने लिहिले की, आज पण आम्हाला तुमची खूप आठवण येते.

यापूर्वीही दीपिकाने सांगितले की, अमिताभ बच्चन हे कायमच लक्ष ठेवतात की, ती किती खाते. हेच नाही तर आपले जेवण कोणाला शेअर करत नाही, यावरही त्यांचे लक्ष असते.

या फोटोवरून मोठी पोलखोल करण्यात आलीये. दीपिका पादुकोण हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. दीपिका पादुकोणचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

दीपिका पादुकोण सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आज दीपिका पादुकोण ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. दीपिकाची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे.