
तुम्ही कधी हा विचार केला आहे का? की तुमच्या अंगाला खाज का सुटते? खाज सुटण्याचे अनेक कारणं असू शकतात.

मात्र यातील एक कारण हे देखील सुद्धा आहे, की तुमच्यामध्ये व्हिटॅमिनची कमतरता आहे, त्यामुळे तुमच्या अंगाला खाज सुटते. आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.

तुम्ही अनेकदा असा अनुभव घेतला असेल की वारंवार तुमच्या शरीराला खाज सुटते. मात्र तुम्ही कधी हा विचार केला आहे की असं नेमकं का होतं?

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुमच्या शरीराला खाज सुटत असेल तर ती नेमकी कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होते.

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे तुमच्या शरीराला खाज सुटते, जर तुमच्यासोबतचही असे घडत असेल तर ज्यामध्ये व्हिटॅमीन एच प्रमाण जास्त आहे, अशा पदार्थांचं सेवन करणं योग्य ठरेल. मात्र त्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कोणतेही उपचार करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व नंतरच उपचार करावेत.

दरम्यान व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे देखील तुमच्या शरीरावर रॅशेस निर्माण होऊन शकतात, त्यामुळे शरीराला खाज सुटते.

व्हिटॅमिनची कमतरता याचसोबत शरीराला खाज सुटण्याचे इतर देखील काही कारणं असू शकतात, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांचा सल्ला योग्य ठरतो.