99 टक्के तळीराम इथेच फसतात, थंडीत रम घ्यावी की व्हिस्की, शरीराला जास्त गरम काय ठेवते?

हिवाळ्याच्या हंगामात रमची मागणी प्रचंड वाढते. तळीराम हिवाळ्यात रमकडे वळतात आणि रम शरीर गरम करते, असा दावा करतात. हिवाळ्यात रमची मागणी प्रचंड असते. पण ही गोष्ट खरी आहे का? याबाबत जाणून घेऊयात.

| Updated on: Nov 28, 2026 | 4:50 PM
1 / 6
हिवाळ्यात शरीराला गरम ठेवणे महत्वाचे आहे. अशातच हिवाळा म्हटले की, तळीरामांसाठी मोठा उत्साहच असतो. ओल्डमंक पुन्हा मार्केटमध्ये आले. थंडीमध्ये जास्त लोक रम पिण्यावर भर देतात. तळीरामांना वाटते की, रम किंवा व्हिस्की पिल्याने शरी गरम राहते.

हिवाळ्यात शरीराला गरम ठेवणे महत्वाचे आहे. अशातच हिवाळा म्हटले की, तळीरामांसाठी मोठा उत्साहच असतो. ओल्डमंक पुन्हा मार्केटमध्ये आले. थंडीमध्ये जास्त लोक रम पिण्यावर भर देतात. तळीरामांना वाटते की, रम किंवा व्हिस्की पिल्याने शरी गरम राहते.

2 / 6

पण अशा दारू पिल्याने आपल्याला आपले शरीर गरम झाल्यासारखे वाटते पण प्रत्यक्षा तसे काही नसते. उलट शरीरातील तापमान झपाट्याने कमी होण्याची शक्यता अधिक असते. हिवाळा म्हटले की, रमची मागणी अधिक रमचा रंग डार्क असतो. ती ऊस आणि गुळापासून तयार होते.

3 / 6

काही कंपन्यात त्यात दालचिनी आणि लवंगही टाकतात. मात्र, तळीरामांचे याबाबत वेगळेच मत आहे. त्यांना वाटते की, रम पिल्याने थंडी कमी जाणवते आणि सर्दी, खोकला याचेही समस्या कायमच दूर होते. सैन्यात मोठ्या प्रमाणात हिवाळ्यात रम पिली जाते.

4 / 6

बरेच तळीराम व्हिसीही पितात. पण दारू पिल्याने गरम होते थंडी लागत नाही, हे फक्त मिथ आहे. शरीरात दारू ज्यावेळी जाते, त्यावेळी ती आपल्या रक्तात मिसळते. ज्यामुळे आपल्याला गरम झाल्यासारखे वाटते. मुळात म्हणजे रम असो किंवा व्हिस्की यांच्यात दारूचे प्रमाण 40 ते 42 टक्के ABV असते.

5 / 6

त्यामुळे व्हिसी थंड आणि रम गरम असे अजिबात काही नाही. दोन्ही दारू आपल्या शरीरावर एकसारखाच परिणाम करतात. रममध्ये थोडीफार मसाल्यांची जव असल्याने ती हिवाळ्यात अधिक पिली जाते.

6 / 6

हिवाळ्याला सुरूवात झाली की, तळीरामांकडून मोठ्या प्रमाणात रमची मागणी केली जाते. त्यामागील त्यांचे लॉजिंग हे खूप वेगळे आहे. त्यांच्या जे वाटते तसे काहीच नसते. पण त्याचीच मागणी अधिक होते. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us