AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Politics: अखेर मविआत ठिणगी पडली! ‘आम्ही ती जागा लढणार, कसे जिंकताय बघतो’, ठाकरे गटाचे शरद पवारांच्या खासदाराला आव्हान

शरद पवार यांच्या या निर्णयानंतर काँग्रेसने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही असा निर्णय घेतला तर महाराष्ट्र माफ करणार नाही, असं म्हटलं आहे. याबाबतच बोलताना संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या खासदाराला थेट आव्हान दिले आहे.

Maharashtra Politics: अखेर मविआत ठिणगी पडली! 'आम्ही ती जागा लढणार, कसे जिंकताय बघतो', ठाकरे गटाचे शरद पवारांच्या खासदाराला आव्हान
Uddhav Thackeray
| Updated on: Nov 28, 2026 | 4:40 PM
Share

Sanjay Raut Challlenge To NCP MP:  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद रंगल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार यांच्या या निर्णयानंतर काँग्रेसने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही असा निर्णय घेतला तर महाराष्ट्र माफ करणार नाही, असं म्हटलं आहे. याबाबतच बोलताना संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या खासदाराला थेट आव्हान दिले आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

“आत्तापर्यंत या देशद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केल्याचे निदर्शनास आले आहे, जे चुकीचे आहे. हे चुकीचं म्हणजे चुकीचेच आहे, त्याचे समर्थन करता येणार नाही. त्याबद्दल खुलासे कराल तर जनतेला हे मान्य नाही.यामधील बहुसंख्य मतदारसंघांमध्ये शिवसेनेचा प्रभाव आहे. शिरुरचा मतदारसंघ असेल, शिवसेनेशिवाय तुम्ही तिथे जिंकू शकत नाही हे मी अमोल कोल्हेंना सांगू इच्छितो. आम्ही त्या जागा लढू. कसे जिंकून येताय बघतो. आमची माढ्यातही ताकद आहे. आम्ही लढू आणि काय आहे महाराष्ट्र हे दाखवू. आमचाही पक्ष फोडला पण आम्ही शरण नाही गेलो,” असं संजय राऊत म्हणालेत.

“तुम्ही भाजपला मदत करणार असाल तर आधी तुम्ही अनिल देशमुखांची माफी मागितली पाहिजे. भाजप आणि शहामुळे ते तुरुंगात गेले. तुम्ही नवाब मलिक यांचीही माफी मागितली पाहिजे. तेव्हा मलिक महत्त्वाचे नेते होते. हे दोन्ही नेते अमित शाह आणि मोदींच्या प्रवृत्तींविरोधात लढत होते. त्यांच्यामुळे या दोन्ही नेत्यांना तुरुंगात जावे लागले,” असा घणाघातही संजय राऊत यांनी केला आहे.

‘राज्यातील जनता सहन करणार नाही…’

दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तर तो दुर्दैवी असेल. अशा कोणत्याही पक्षाने फुले, शाहू, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेऊ नये. तुमचे आठ खासदार निवडून आले. ते महाविकास आघाडी म्हणून आले. भाजपमुळे आले नाही. अशावेळी एकतर्फी निर्णय घेऊन सरकारच्या बाजूने उभे राहत असाल तर राज्यातील जनता सहन करेल असं वाटत नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.

Follow Us
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!
मोदी सरकारला पाठिंबा द्या'; परिणय फुके यांचे उद्धव ठाकरेंना आवाहन
मोदी सरकारला पाठिंबा द्या'; परिणय फुके यांचे उद्धव ठाकरेंना आवाहन
हुंड्यासाठी विवाहितेला मानसिक आणि शारीरिक त्रास; सोलापुरात सासरच्या...
Solapur : हुंड्यासाठी विवाहितेला मानसिक आणि शारीरिक त्रास; सोलापुरात सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल
डिलिमिटेशन विधेयकावरून एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले....
Eknath Shinde : डिलिमिटेशन विधेयकावरून एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले....
शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून कॅन्सर रुग्णालयात हलवलं
Sharad Pawar : शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून कॅन्सर रुग्णालयात हलवलं; नेमकं काय कारण? सुप्रिया सुळेंनी सांगितलं...
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राहुल गांधींची स्वतंत्र पत्रकार परिषद...
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राहुल गांधींची स्वतंत्र पत्रकार परिषद; डिलिमिटेशनवर भूमिका स्पष्ट करणार?
डिलिमिटेशन विधेयकावरून मविआत मतभेद उघड? आदित्य ठाकरेंनी घेतली आक्रमक..
डिलिमिटेशन विधेयकावरून मविआत मतभेद उघड? आदित्य ठाकरेंनी घेतली आक्रमक भूमिका!