Deool Band 2 : थिएटरमध्ये स्वामींचा जयजयकार; वीकेंडला ‘देऊळ बंद 2’ची दुप्पट कमाई, आतापर्यंत किती कलेक्शन?

Deool Band 2 Box Office Collection : थिएटरमध्ये स्वामी समर्थांचा जयजयकार सुरू असून 'देऊळ बंद 2' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन दिवसांत या चित्रपटाने किती कोटी रुपयांची कमाई केली, ते जाणून घेऊयात..

| Updated on: May 24, 2026 | 2:54 PM
1 / 5
2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'देऊळ बंद' या चित्रपटाला दुसरा भाग 21 मे 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'नंतर आता प्रवीण तरडे यांचा हा चित्रपट दमदार कामगिरी करतोय. विशेष म्हणजे पहाटेच्या शोसाठीही प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली. अनेक थिएटर्समध्ये या चित्रपटाचे शोज हाऊसफुल्ल झाल्याचं पहायला मिळत आहे.

2 / 5
'देऊळ बंद 2'ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 2.45 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 2.55 कोटी रुपयांची कमाई झाली होती. 'देऊळ बंद 2'च्या वीकेंडच्या कमाईत दुप्पट वाढ झाल्याचं पहायला मिळालं. पहिल्या शनिवारी कमाईचा आकडा 4.85 कोटी रुपयांवर पोहोचला.

3 / 5
'देऊळ बंद 2' या चित्रपटाने आतापर्यंत भारतात 9.85 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन आणि 11.62 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, जळगाव, विदर्भ आणि मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरत आहे.

4 / 5
2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'देऊळ बंद' या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनीने राघव शास्त्रीची मुख्य भूमिका साकारली होती. आता 'देऊळ बंद 2'मध्ये प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडेनं एका शेतकरी महिलेची मुख्य भूमिका साकारली आहे. तर अभिनेते मोहन जोशी हे पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

5 / 5
या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचं आहे. त्यांच्या वास्तववादी मांडणीमुळे आणि प्रभावी लेखनशैलीमुळे चित्रपट अधिक प्रभावी ठरला आहे. प्रदर्शित होताच मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे ‘देऊळ बंद 2 – आता परीक्षा देवाची’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील यंदाचा सर्वाधिक चर्चेत असलेला आणि संभाव्य ब्लॉकबस्टर चित्रपट ठरणार असल्याची चर्चा चित्रपट वर्तुळात सुरू झाली आहे.

Follow Us