Tauktae Cyclone | महाराष्ट्रावर ‘तौत्के’ चक्रीवादळाचं सावट, अजित पवार थेट मंत्रालय नियंत्रण कक्षात, वादळ परिस्थितीचा आढावा

| Updated on: May 17, 2021 | 12:11 PM

राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन आणि नियंत्रण कक्षास भेट दिली. (Ajit Pawar visit Ministry Control Room)

1 / 7
राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन आणि नियंत्रण कक्षास भेट दिली.

2 / 7
यावेळी त्यांनी राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव आणि मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.

3 / 7
उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली.

4 / 7
तसेच बचाव आणि मदतकार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

5 / 7
उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात उपस्थित राहून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून राज्यातील वादळ परिस्थितीवर व्यक्तीश: लक्ष ठेवून आहेत.

6 / 7
तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट  देण्यात आला आहे. तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

7 / 7
नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य  प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे असेही उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.