
मागच्या तीन दिवसात हिमाचल-उत्तराखंड राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे. नदीला पूर आल्यामुळे सगळीकडं पाणीचं दिसतं आहे. नदीच्या पाण्यातून अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. त्याचबरोबर अनेकांना मृत्यू देखील झाला आहे.

देशात अनेक राज्यात मागच्या काही दिवसात चांगला पाऊस झाला आहे. हिमाचल-उत्तराखंड या दोन राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे. सध्या दोन राज्यात भयानक स्थिती असून NDRF पथकाकडून बचावकार्य सुरु आहे.

हिमाचल-उत्तराखंड राज्यातील काही फोटो व्हायरल झाले आहेत. काही घरात पाणी गेलं आहे, काही गाड्या आगपेटी सारख्या पाण्यातून वाहून गेल्या आहेत. काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत.

पंजाब आणि हरियाणा सरकारने मदत मागितली आहे. यानंतर लष्कराच्या वेस्टर्न कमांडच्या तुकड्या दोन्ही राज्यांमध्ये मदतीसाठी पाठवण्यात आल्या.

उत्तराखंड राज्यात अनेक ठिकाणच्या आज शाळा बंद राहणार आहेत. गंगोत्री मार्गावर 3000 पर्यटक अडकले आहेत. NDRF पथकाकडून बचावकार्य सुरु झालं आहे.