गेम चेंजर! ‘देवमाणूस : मधला अध्याय’मधील ट्विस्ट पाहून चक्रावलं प्रेक्षकांचं डोकं

अजित लालीच्या जाळ्यात अडकेल का? शामल अजितच्या तावडीत सापडेल का, या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहेत. 'देवमाणूस: मधला अध्याय' ही मालिका दररोज रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होते.

Updated on: Dec 03, 2025 | 9:58 AM
1 / 5
झी मराठी वाहिनीवरील 'देवमाणूस: मधला अध्याय' या मालिकेचं कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. आर्या आणि साकेतमधील वादानंतर परिस्थिती गंभीर बनली आहे.

2 / 5
आर्या हा संपूर्ण प्रसंग अजितला सांगते आणि अजित तिला बँकेतून पैसे काढण्यास प्रवृत्त करतो. मात्र, त्या व्यवहारासाठी साकेतची सही आवश्यक असल्याने तो नकार देतो. त्यामुळे त्यांच्यात तीव्र वाद निर्माण होतो. वाद वाढत असतानाच आर्या भावनिकदृष्ट्या अजितच्या अधिक जवळ येऊ लागली आहे.

3 / 5
हे पाहून लालीच्या मनात मत्सर निर्माण होतो. दरम्यान अजित आर्याला भेटण्याचं प्रयत्न करत असताना साकेतविरुद्ध खोट्या अफवा पसरवण्याचं षड्यंत्रही आखतो, ज्यामुळे जामकरच्या मनातला संशय अधिक बळावणार आहे.

4 / 5
अजितच्या अफवांमुळे जामकर रागाने साकेतला जबरदस्तीने गाडीत बसवून घेऊन जातो. त्यांच्या मागोमाग अजितही निघतो. एका निर्मनुष्य ठिकाणी जामकर साकेतला ठेवतो. अजित साकेतला सामोरं जातो आणि त्यातून दोघांमध्ये संघर्ष होतो. रागाच्या भरात अजित त्याचा खून करून त्याचा मृतदेह नदीत फेकून देतो.

5 / 5
त्याचवेळी शामल अजितला साकेतचा खून करताना पाहते आणि भीतीने जंगलात पळते. तिच्या जीवाला  धोका निर्माण होतो. त्याच जंगलात लालीने अजितला अडकवण्यासाठी जाळं लावलं आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार, याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.