लालबागच्या राजाच्या चरणी भक्तांनी किती केले दान?, सोने-चांदी आणि रोख रकमेवरही दिला भर

लालबागच्या राजाच्या चरणी यंदाही भाविकांकडून भरघोस दान अर्पण करण्यात आले आहे. लालबागच्या चरणी यंदा कोट्यवधी रुपये दान करण्यात आले असून सोनं-चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंचा यात समावेश आहे.

| Updated on: Sep 29, 2026 | 9:48 PM
1 / 7
गणेशोत्सवात यंदाही लालबागच्या राजाच्या दर्शनाला अलोट गर्दी झाली होती. चरण स्पर्श आणि नवसाच्या रांगा दोन्हींमध्ये भक्तांचा महापूर वाहात होता.

गणेशोत्सवात यंदाही लालबागच्या राजाच्या दर्शनाला अलोट गर्दी झाली होती. चरण स्पर्श आणि नवसाच्या रांगा दोन्हींमध्ये भक्तांचा महापूर वाहात होता.

2 / 7

लालबागचा राजा नवसाला पावतो अशी ख्याती असल्याने दरवर्षी भाविक नवस फेडायला लालबागला येत असतात. या वेळ भक्त आपल्या मनातील इच्छा बाप्पाने पूर्ण केल्याने दान करतात

3 / 7

यंदा लालबागच्या चरणी भाविकांनी सौने चांदीच्या वस्तू आणि दागिने तसेच रोख रक्कम देखील दान केली आहे.

4 / 7

यंदा लालबागच्या राजाच्या भक्तमंडळींना अंबानी यांच्याकडून महाप्रसादाची सोय करण्यात आली होती.

5 / 7

लालबागच्या राजाच्या चरणी या वर्षी एकूण 6 कोटी 11 लाख 96 हजार 500 रुपयांचे रोख रक्कमेच्या स्वरूपात दान करण्यात आले आहेत.

6 / 7

यामध्ये स्टेजपेटी, रांगपेटी आणि मिरवणूक पेटीतील रोख रकमेचा समावेश करण्यात आला आहे.

7 / 7

इतर सोनं- चांदी आणि इतर वस्तूच्या झालेल्या दानाचा उद्या लालबागच्या मंडपात लिलाव केला जाणार आहे. या लिलाव प्रक्रियेत सर्वांना सहभागी होता येणार असल्याचे मंडळाने म्हटले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us