
शो मध्ये धनश्रीच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दल खूप बोललं जातय. काही स्पर्धक युजवेंद्र चहलसोबतच्या तिच्या घटस्फोटावर बोलले. अभिनेत्री आहाना कुमरा सुद्धा धनश्रीबद्दल अनेकदा बोललीय. ती सर्व मुलांसोबत बनवून ठेवते असं आहाना कुमरा म्हणाली.

आता शो च्या काही क्लिप्स व्हायरल होतायत. यात धनश्री खूप रडताना दिसतेय. शो मध्ये पर्सनल लाइफ आणि घटस्फोटाबद्दल इतर स्पर्धकांनी बोलणं धनश्रीला अजिबात आवडलं नाही. ती शो सोडण्याची धमकी देतेय.

धनश्री रडत, रडत बोलली मी माझं पर्सनल लाइफ कधीच समोर मांडलेलं नाही. मी कधीच कोणाबरोबर या विषयावर बोललेली नाही. धनश्री पुढे अशनीर ग्रोवरशी बोलली की, मी आयुष्य बघितलय. मी यापुढे आहनावर कधीच विश्वास ठेऊ शकणार नाही. मला खूप वाईट वाटलं.

धनश्री शो सोडण्याबद्दल सुद्धा बोलली. ती ओरडून बोलली की, हे सर्व काय आहे? मी हा शो करु शकत नाही. अशनीर ग्रोवर नंतर धनश्रील समजावण्याचा प्रयत्न करतो. पण ती म्हणते की, मी माफी मागते पण हा शो करु शकत नाही. आयुष्य पुन्हा मार्गावर आणण्यासाठी खूप हिम्मत लागते.

अशनीर ग्रोवर धनश्रीला शो मधून वॉकआऊट करण्यापासून रोखतो. तुझा आदर ठेवणं माझी जबाबदारी आहे. पवन सिंह सुद्धा धनश्रीच्या खांद्यावर हात ठेऊन तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो.