
धनश्रीने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत धनश्रीने जे कॅप्शन लिहिलं आहे. त्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

फोटो पोस्ट करत धनश्री म्हणाली, 'एका जागी थांबून पाहणं योग्य आहे...' सध्या सर्वत्र धनश्रीच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. चाहत्यांमध्ये देखील धनश्रीच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. नेटकरी देखील तिच्या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

कोरोना महामारीमुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये युजवेंद्र आणि धनश्री यांच्याच मैत्री झाली होती. धनश्री कोरिओग्राफर असल्याने चहलने तिच्याकडे डान्सचा ऑनलाइन क्लास लावला होता.

या मैत्रीचं हळूहळू प्रेमात रुपांतर झालं. अखेर डिसेंबर 2020 मध्ये दोघांनी मोजक्या पाहुण्यांच्या आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

धनश्री आणि युजवेंद्र हे गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहत होते . मुंबई उच्च न्यायालयाने वांद्र्याच्या कौटुंबिक न्यायालयाला त्यांच्या घटस्फोटाच्या याचिकेवर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आणि दोघांचा घटस्फोट मंजूर झाला.