
कोरिओग्राफर धनश्री वर्माला आज संपूर्ण देश ओळखतो. सोशल मीडियावर तिचे लाखो फॅन्स आहेत. तिने टाकलेल्या एका फोटोवर लाखो लाईक्स येतात.

धनश्री वर्माने काही महिन्यांपूर्वी क्रिकेटर युजवेंद्र चहलसोबत घटस्फोट घेतला आहे. त्यांच्या घटस्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र आता दोघेही कायदेशीररित्या विभक्त झालेले आहेत.

कायद्यानुसार धनश्रीला पोटगीदेखील मिळालेली आहे. पती-पत्नी म्हणून नात्यात असताना धनश्री आणि युजवेंद्र यांनी अनेकदा एकत्र असलेले फोटो सोशल मीडियावर अपलोड केलेल आहेत. विशेष म्हणजे दोघांनीही एकमेकांप्रतीचे प्रेम उघडपणे व्यक्त केलेले आहे.

आता मात्र धनश्री आणि युजवेंद्र विभक्त झाले आहेत. दोघांचाही तसा काहीही संबंध राहिलेला नाही. मात्र विभक्त झालेले असले तरीही धनश्रीचं टेन्शन मात्र अद्याप संपलेलं नाही.

नेटकरी तिला अजूनही युजवेंद्र चहलच्या नावाने ट्रोल करतात. तिने नुकतेच नवे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या तिच्या या नव्या फोटोंना लाखोंनी लाईक्स आहेत. तर काही लोकांनी तू खूपच सुंदर दिसत आहेस, असे म्हणत तिचे कौतुक केले आहे.

काही नेटकऱ्यांनी मात्र तिला ट्रोल केलंय. युझवेंद्र चहलचं नाव घेत तिच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तू गोल्ड डिगर आहेत, असं म्हणत एका नेटकऱ्यांने तिला ट्रोल केलंय.

तर आणखी एका नेटकऱ्याने युजवेंद्र चहलमुळे तुला ओळख मिळाली. आता तुला कोणीही ओळखत नाही, अशा आशयाची कमेंट करत तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी तर धनश्री पोटगीचे धन घेऊन मोकळी झाली, अशा आशयाच्याही कमेंट्स केल्या आहेत.

दरम्यान, युजवेंद्र चहलचे नाव घेत तिला ट्रोल करण्यात येत असलं तरीही ती ट्रोलर्सना भीक घालत नाही. ती विचलित न होता तिचे काम करत राहते. नुकतेच तिचे काही व्हिडीओ साँग आलेले आहेत. यात तिने केलेल्या नृत्याचे तोंडभरून कौतुक होत आहे.