
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर, डान्सर धनश्री वर्माने काही दिवसांपूर्वीच घटस्फोट घेतला. लग्नाच्या केवळ चार वर्षानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता धनश्रीला काही रिअॅलिटी शोची ऑफर आली आहे.

घटस्फोटानंतर धनश्रीचे नशीब फळफळे असल्याच्या चर्चा आहेत. कारण तिला एकाच वेळी दोन मोठ्या रिअॅलिटी शोची ऑफर आली आहे. आता हे शो कोणते असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

धनश्री वर्माला दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी' या शोच्या १५व्या सिझनची ऑफर आली आहे. निर्मात्यांनी धनश्रीशी संपर्क साधला होता. आता त्यावर धनश्रीने काय उत्तर दिले हे अद्याप समोर आलेले नाही.

त्यापाठोपाठ धनश्रीला बिग बॉस ओटीटी सिझन ४ची देखील ऑफर आली आहे.

घटस्फोटामुळे धनश्री लाईमलाइटमध्ये आहे. त्यामुळे टीआरपीसाठी तिचा फायदा होऊ शकतो असे म्हटले जात आहे. असे असले तरी धनश्री नेमकं कोणत्या शोमध्ये दिसणार हे स्पष्ट झालेलं नाही.