
साऊथचा सुपरस्टार धनुष हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. कॅप्टन मिलर चित्रपटाचा फर्स्ट लूक पुढे आला आहे. विशेष म्हणजे चाहत्यांना फर्स्ट लूक जबरदस्त आवडल्याचे दिसत आहे.

धनुष कॅप्टन मिलर चित्रपटामुळे चर्चेत असतानाच आता काही फोटो हे धनुष याचे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. हे फोटो तिरुपती बालाजी मंदिरातील आहेत.

नुकताच धनुष हा तिरुपती बालाजी मंदिरातील दर्शनासाठी गेला होता. याचेच काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी धनुष याच्यासोबत त्याचे मुले आणि आई वडिल दिसत आहेत.

धनुष याने तिरुपती बालाजी मंदिरामध्ये केस दान केल्याचे त्याच्या फोटोवरून दिसत आहे. विशेष म्हणजे धनुष याचे हे फोटो त्याच्या चाहत्यांना आवडल्याचे दिसत आहे.

धनुष याच्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी धनुष याचा हा नवा लूक आवडल्याचे देखील दिसत आहेत. हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.