Dhruv Rathee Wife: ध्रुव राठीच्या जर्मन बायकोच्या ग्लॅमर पुढे मॉडेलही फिकी, करते तरी काय?
सीजेपी आंदोलनात युट्यूबर ध्रुव राठी यांचा सहभाग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आंदोलनापूर्वीच गुरूग्राममधील त्यांच्या घरातून दिल्ली पोलिसांनी सकाळी 8 वाजता ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. ध्रुव कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात. अशात त्याच्या कुटुंबियांबद्दल देखील जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. सध्या त्यांच्या पत्नीचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी सध्या सीजेपी आंदोलनासाठी भारतात आहेत. आंदोलन सुरु होण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
सध्या सर्वत्र युट्यूबर ध्रुव राठी यांची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे लोक त्यांच्या कुटुंबियांबद्दल सर्च करत आहेत. जाणून युट्यूबर ध्रुव राठी यांची बायको कोण आहे.
युट्यूबर ध्रुव राठी यांच्या बायकोचं नाव जूली एलबीआर - राठी असं आहे. जूली मुळची जर्मन येथील आहे आणि तेथेच तिने शिक्षण पूर्ण केलं आहे.
युट्यूबर ध्रुव राठी यांची बायको हेल्थकेअर प्रोफेशनल सोबतच कंटेंट क्रिएटर देखील आहे. ध्रुव आणि जूली यांची पहिली ओळख 2014 मध्ये जर्मनी येथे झालेली.
2014 मध्ये दोघांची पहिली भेट जर्मनी येथेच झालेली. तेव्हा ध्रुव इंटर्नशिप जात होते, तर जूली हिचं शालेय शिक्षण पूर्ण झालं होतं.
त्यानंतर त्यांच्या भेटीचं रुपांतर मैत्रीत झालं आणि त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. जवळपास 8 वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. त्यानंतर 2021 मध्ये त्यांचं लग्न झालं.
लग्नानंतर तीन वर्षांनी ध्रुव आणि जूली यांच्या घरी पहिल्या बाळाचं आगमन झालं. जुली आणि ध्रुव या दोघांनाही प्रवासाची आवड आहे आणि ते अनेकदा फोटो शेअर करत असतात.
जूली इन्स्टाग्रामवर बरीच सक्रिय आहे; या प्लॅटफॉर्मवर तिचे ३ लाख ८७ हजार फॉलोअर्स आहेत. ध्रुव राठीची पत्नी एखाद्या मॉडेल किंवा अभिनेत्रीपेक्षा कमी सुंदर नाही.